ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या वतीने बाल कवी संमेलन,वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

इंदिरानगर :- ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेच्या वतीने बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुपेरी काव्यहोत्राचा मराठी कविता वाचनाच्या सलग 25 तास स्वरचित मराठी कविता वाचनात 680 कवींनी सहभाग घेऊन विश्वविक्रमाचा वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 
दि.19जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचे समारोह सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर गुरुजी रुग्णालयचे प्रकाश पाठक, अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना, मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल,कौशल घोडके, शिक्षण अधिकारी बी.टी. पाटील,कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी,नितीन ठाकरे,ईश्वर चव्हाण,कवयित्री अलका कुलकर्णी,नंदकिशोर ठोंबरे, कवी डॉ. चिदानंद फाळके विनायक रानडे ,या समवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष माननीय ल .जि. उगांवकर , सचिव गोपाळ पाटील,  सहसचिव डॉ.अंजली पाटील,संचालक छाया निखाडे,अनिल भंडारी, अजय ब्रम्हेचा,परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी तसेच विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार, व कल्पना चव्हाण, यांनी आपल्या केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला