कलाविष्कारांनी रंगली मविप्र युवा स्पंदनची अंतिम फेरी



नाशिक : गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र युवा स्पंदनच्या अंतिम फेरी सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे. समवेत मान्यवर

विविध २० कलाप्रकारांमध्ये बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक :- गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र युवा स्पंदनच्या अंतिम फेरीतील कलाविष्कारांचा आस्वाद घेताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर

नाशिक  नाटक, संगीत, गायन, वादन, साहित्य व ललितकला विभागांतील १४ कलाप्रकारांमध्ये सहभागी होत विविध महाविद्यालयांमधील तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्कारांनी मविप्र युवा स्पंदनची अंतिम फेरी रंगली. 
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘मविप्र युवा स्पंदन’चे आयोजन केले जाते. प्राथमिक फेरी पार पडल्यानंतर शुक्रवारी (दि.१७) गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र युवा स्पंदन अंतिम फेरी पार पडली. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. याप्रसंगी मविप्रचे नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. के. एस. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे, डॉ. व्ही. बी. बोरस्ते, डॉ. कल्पना अहिरे, परीक्षक रवींद्र कदम, आदिल शेख, सतीश वराडे, उत्तम करमाळकर, आनंद अत्रे, सागर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, विद्यार्थ्यांमधील विविध सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी युवा स्पंदनच्या माध्यमातून त्यांना रंगमंच मिळाला आहे. यावेळी विविध २० कला प्रकारांमध्ये मविप्र संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांतील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अंतिम फेरीत दाखल झालेल्या व सामाजिक संदेश देणाऱ्या सहा एकांकिकांचे व सहा मुकनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. लाइट व्होकल, क्लासिकल होकल सोलो, पर्क्युशन तालवाद्य, नॉन परक्युशन स्वर वाद्य स्पर्धाही संपन्न झाल्या. इंटेरियर डिझाइन विभागात पोस्टर, रांगोळी, मेहंदी, फोटोग्राफी स्पर्धा, मायक्रोबायोलॉजी हॉलमध्ये वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, डेलिगेट डोममध्ये मिमिक्री, आणि लघुनाटिका स्किट या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धा समन्वयक डॉ. तुषार पाटील यांनी प्राथमिक स्पर्धेचा आढावा घेतला. यावेळी प्रा. छाया लभडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. याप्रसंगी मविप्रच्या विविध महाविद्यालयांमधील प्राचार्य, विभागप्रमुख व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.

मविप्र युवा स्पंदनच्या माध्यमातून भविष्यात करिअरच्या संधी : ॲड. नितीन ठाकरे
नाटक, संगीत, गायन आदी सांस्कृतिक क्षेत्रातही करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही याचा विचार केला आहे. यामध्ये विज्ञानाचा विद्यार्थी चित्रकला, संगीत आदी विषयांची त्याच्या आवडीनुसार निवड करू शकतो. आज दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये गायन, नृत्य, नाटक आदी कलांमध्ये स्वतःच्या प्रतिभेला वाव मिळून पुढे जाता येते. मविप्र युवा स्पंदनच्या माध्यमातून आपले विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढे जातील आणि भविष्यात चांगले करिअर घडवतील, असा विश्वास मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला व सर्व सहभागी स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते आज बक्षीस वितरण
शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते २ वाजेदरम्यान कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहामध्ये संगीत विभागातर्फे वेस्टर्न व्होकल सोलो, वेस्टर्न ग्रुप, भारतीय समूहगीत, फोक आर्केस्ट्रा तर, नृत्य विभागातर्फे शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य अशा सहा कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. सायंकाळी ४:०० वाजता शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील व मविप्र संस्था पदाधिकारी, संचालक यांच्या उपस्थितीत समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला