नवीन नाशिक शिवाजी चौक परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
नाशिक :- महापालिका हद्दीतील नवीन नाशिक परिसरामध्ये शिवाजी चौक तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रोडाचे काम चालू असताना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिवर लाईन टॉयलेटचे दुर्गंधीयुक्त पाणी नळावाटे आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरातील घरांमध्ये टॉयलेट मिश्रित पाणी आल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेने तत्परतेची भूमिका दाखवून लगेच त्यावरती उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. जे लोक आजारी पडतील त्यांचा मेडिकलचा खर्च प्रशासनाने करावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. लोकांच्या पिण्याच्या पाणी प्रकरणी दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल स्थानिक महिलांचा रोष बघता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दालनात दुर्गंधीयुक्त पाणी भेट देऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी स्थानिकांनी भूमिका घेतली आहे.
यावेळी कृष्णा मामा काळे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक यांनी स्थानिकांच्या सांगण्यावरून महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी कर्मचारी ड्रेनेज लाईनच्या अधिकारी कर्मचारी विभागीय अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांना कळविले अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम करून देऊ असे स्थानिक रहिवाशांना आश्वासन दिले आहे.यावेळी गायत्री जगताप ताई , स्वाती कवठे ताई , विद्या भालेराव ताई , शेख बाबी ,हर्षदा चव्हाण ताई , सोनार ताई , सानप ताई , जाधव ताई , राऊत काका , किशोर समधादिया आणि परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment