नाशिक :- दि.१८|०१|२०२५ शनिवार रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयातील नानविज पोलीस बॅच ने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तपोवनात श्री.लक्ष्मण मंगल कार्यालय नाशिक येथे पार पाडला.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सदर कार्यक्रमात जवळपास ७५ महिला व ६० पुरूषानी भाग घेतला.प्रत्येक महिलांना हळद कुंकु लावुन एक वाण व गुलाब पुष्प व गजरा, तिळगुळ देण्यात आले.पुरूषांनी कुटुंबाची ओळख करून दिली. तसेच तिन लकी ड्रॉ काढण्यात आले.संगित खुर्ची चा खेळ घेण्यात आला.चहा नाष्टा व जेवण पण देण्यात आले.महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.त्याशिवाय महिलांनी नाचगाणी पण केली. प्रत्येक वर्षी नानविज पोलीस बॅच चा गेटटुगेदर चा कार्यक्रम पण होतो. महिलांचा व्हाॅटस्प ग्रुप तयार करण्यात आला.३४ वर्षा नंतर नानविज पोलीस बॅच चे कुटुंब एकत्र आले त्यात महिला, पुरूष, मुले,मुली सुना, जावई,नातवंडे, आई, वडील एकत्र आले.ह्या वयात ७५ महिला मैत्रीणी झाल्या होते.आता प्रत्येक वर्षी मकर संक्रांत च्या निमित्ताने हाळदी कुकु चा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली,भारत माता की जय घोषणा देण्यात आली.
सदर कार्यक्रमात धरती कोकाटे पाटील, सुविज्ञा मेतकर,हर्षदा शेळके, जयश्री बगाडे यांनी अतिशय परीश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला.
Comments
Post a Comment