जयश्री पवार यांच्या हस्ते खिर्डी ते मोहाचीमाळी पुलाच्या कामाचे उद्घाटन
गोपाळ धुम, तुकाराम देशमुख, युवराज लोखंडे, पुंडलिक खंबायत, सावळिराम महाले, काशिनाथ वाघमारे, जयराम कोहकिरे,आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाल्या की, सुरगाणा तालुक्याला विकासाच्या दृष्टीने कळवण बरोबर आणण्यासाठी काम करणार असून तालुक्यातील कानाकोप-यात विकासाची गंगा पोहचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अनेक वर्षांनु वर्ष थांबलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पक्षाचा विचार न करता निसंकोच पणे कामे घेऊन यावीत त्या कामांचा पाठपुरावा करण्यात येईल. तालुक्यातील शेतकरी, महिलांनी ज्या गावात दुध उत्पादन होत असते त्यांनी दुध प्रक्रिया उद्योगा जसे खवा,तूप, दही,ताक,चीज पनीर याकडे वळावे यातून निश्चित आर्थिक फायदा होत असतो. सेंद्रिय भाजीपाला, फळे यांना खुप मागणी असून त्याचे उत्पादन घेतले पाहिजे. महिला बचतगटांना सक्षम केले पाहिजे.
सिंचनासाठी तान,मान, नार, पार नदीवर होणा-या वळण योजना साठी कोणाचेही विस्थापन होणार नाही. प्रथम प्राधान्य तालुक्याला पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
गोपाळ धुम, तालुक्यात रस्ते, वीज, आरोग,सिंचन, पिण्याचे पाणी या विकासाच्या बाबतीत परिस्थिती खुपच बिकट आहे. या पुर्वी विकास कामांत पक्षपाती पणा केला जात असे.आता तसे होणार नाही विकासा करीता समस्या घेऊन कोणीही या कामे होणारच असेही पवार म्हणाल्या.
यावेळी वसंत दहावाड, जयराम कोहकरे, रमन माथड, तुकाराम कोहंकेरे, गणेश कोहंकेरे, कमलेश दाहवड, रामदास नेवळ, जयराम राथड, श्रावण कोहंकेरे, लहुराम कोहंकेरे, मंगळु दाहवड, तसेच जे.एम.वाघ, उपविभागीय अधिकारी,
. एच. डी. बागुल, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ , सा.बां. उपविभाग क्र.२, सुरगाणा.संदिप दरगोडे, कंत्राटदार आदि उपस्थित होते.
* तालुक्यात जल जीवन मिशन राबविणार.
* मुला मुलींचे विवाह योग्य वयात न केल्याने प्रसूती करीता समस्या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात.
* अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी वळण योजना राबवून अडविण्याचा प्रयत्न करणार.
* तालुक्यात प्रस्तावित अकरा लघुसिंचन योजनांचा पाठपुरावा करणार.
* सिंचनासाठी धरणे, तलाव, सिंमेट बंधारे बांधण्याला प्राधान्य देणार.
* गुजरात, पिंपळगाव येथे होणारे स्थलांतर थांबविले जाणार - माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार.
Comments
Post a Comment