नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार जाहीर



मान्यवरांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी होणार गौरव सोहळा
नाशिक : - नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने, यंदाच्या वर्षीही कार्यसन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचे हे 28 वे वर्ष असून सालाबादप्रमाणे यंदाही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांतील पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. या वर्षी हा कार्यक्रम शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी, दुपारी 2.30 वाजता, सातपूर येथील नाइस सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.  

जीवनगौरव पुरस्काराने किशोर फडे मामा यांचा सन्मान

संपादन क्षेत्रात तब्बल 45 वर्षांचा प्रदीर्घ व सर्वसमावेशक योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचा उचित आदर व्यक्त केला जाणार आहे.  

कार्यसन्मान पुरस्कार प्राप्त पत्रकारांची यादी 
प्रिंट मीडियामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल खालील पत्रकारांची निवड करण्यात आली आहे:  

- रामभाऊ आवारे (पत्रकार)  
- सतीश परदेशी (पत्रकार)  
- सुधीर पेठकर (दै. नवराष्ट्र)  
- रवींद्र केडिया (दै. देशदूत)  
- वसंत आव्हाड (दै. पुण्यनगरी)  
- मनोज घोने (दै. दिव्य मराठी)  
- गोकुळ सोनवणे (दै. लोकमत)  
- सतीश निकुंभ (दै. सकाळ)  
- सागर आनप (दै. पुढारी)  
- नामदेव पवार (दै. महाराष्ट्र टाइम्स)  
- मच्छिंद्र बोरसे (दै. आपला महानगर)  
- अश्विनी पांडे (दै. गावकरी)  
- चंद्रशेखर गोसावी (दै. हमारा महानगर)  
- दिनेश जाधव (दै. लोकनामा)  
- मुकुंद बाविस्कर (दै. भ्रमर)  
- संजय परदेशी (साप्ता. नाशिक खबर)  
- योगेश रोकडे (दै. लोकमंथन)  
- भैय्यासाहेब कटारे (दै. महासागर)  

इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी
इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील पत्रकारांचा समावेश आहे:  

- संतोष लचके (नाशिक लोकशाही न्यूज)  
- दिनेश पगारे (दक्ष न्यूज)  
- रश्मी मारवाडी (दुनियादारी)  
- ज्ञानेश्वर आंधळे (नाईन न्यूज)  
- अमर सोळंके (मी नाशिककर न्यूज)  
- अभिषेक ताकाटे (एनसीएन न्यूज)  
- अविनाश पाटील (दक्ष पोलीस न्यूज)  
- ज्ञानेश्वर तुपसुंदर (DKD News)  
- अनिल केदारे (भारत माझा न्यूज)  

सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव
सामाजिक योगदानाबद्दल खालील मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे:  

- निलीनी मधुकर कड ( सायकल ईस्ट नाशिक ते अयोध्या)  
- रोशनी भामरे व जाधव (गर्भवती महिलेची यशस्वी प्रस्तुती )  
- रंजीत नलावडे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर)  
- दिनेश पाटील ( नाईस संकुल चेअरमन )  
- डॉ. सौ. ज्योती शिंदे केदारे ( मिसेस मलेशिया एशिया पॅसिफिक विनर 2024 )  
- अश्विनी देवरे मॅडम (आर्यन वुमन)  
- गजानन माधव देवचके ( 112 वेळा रक्तदान करणारे )  
- सुहासिनी घोडके ( विकलांग मुलांच्या शाळेतील मुख्याध्यापक) 
- राजेश रत्नपारखी व शैलेश पंडित ( जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक)
- सौ. मिनाक्षी जगदाळे ( काऊन्सिलर)
- रिना गजरमल मॅडम ( कल्याण)

पुरस्कार जाहीर करण्यासाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पत्रकार संघाचे मार्गदर्शक दिनेशपंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, खजिनदार पल्लवी शेटे, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, दिनेश पगारे, प्रविण सुरुडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.  

सन्मानाने पत्रकारितेचा गौरव

या सोहळ्याच्या माध्यमातून समाज आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांचे कार्य सन्मानित होणार असून, पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करण्यात येईल. या पुरस्कार सोळ्यास कर्तव्यदक्ष फाउंडेशन व के.पी. एम फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. या सोबत गणेशोत्सव घरगुती आरास स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ व कर्तव्यदक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा आहे याच ठिकाणी संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला