मा.जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण यांच्या हस्ते रस्ता कामांचे भूमिपूजन
सुरगाणा :- माजी खासदार स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण, यांच्या प्रयत्नातून 50 54 t6 आदिवासी उपाय योजनेतून प्रतापगड ते भारुंडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजन कलावती ताई चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य व समीर चव्हाण, के डी बापू चव्हाण,यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, यांच्या प्रयत्नातून प्रतापगड ते भारुंडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता मंजूर झाला त्यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित, यांच्याकडे मा.खा. हरिश्चंद्र चव्हाण, यांनी केलेल्या पाठपूरावा मुळे रस्त्याचे काम मंजूर झाले.असे यावेळी सांगण्यात आले.प्रसंगी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी समीर चव्हाण म्हणाले की रस्त्यामुळे तेथील भारंडी धबधबा बघण्यासाठी पर्यटक येतील आणि तेथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी साहेब प्रयत्नशील होते. साहेबांचा वारसा जपत मी पण माझ्या तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवेल या उटघाट्न प्रसंगी विजय कानडे, नगरसेवक,हर्षवर्धन गावित, संजय पवार नगरसेवक, ललित चव्हाण, नरु पाटिल चव्हाण, गोविंद दळवी,तुकाराम जाधव विठ्ठल गावित ग्राम सदस्य, बकरे काका, परी टीनवाले, पाटिल भाऊसाहेब ठेकेदार, आदिंसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.
Comments
Post a Comment