त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान


त्रंबकेश्वर :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज जी मोदी यांनी त्र्यंबक राज्याच्या सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्णदान केले मागील महिन्यात श्री मनोज मोदी हे त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते तब्बल 200 वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता.

देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून साड़ेआठ किलो चा सुवर्ण मुकुट बनावन्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता .

सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थान कडे जमा झालेले आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दlन करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना 125 तोळे दान करू शकतात असे सांगण्यात आले होते.

त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले.
त्याप्रसंगी त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा,  पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल , स्वप्निल शेलार व प्रदीप तुंगार,उपस्थित होते सदर सुवर्ण दान सहकार्य लाभले असे श्री मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे उपस्थित होते.

सदर सुवर्णदानाची पावती त्यांचा सत्कार करुन सुपूर्द करण्यात आली त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला