प्रभाग 29 मधील काळे मळा परिसरातील राजरत्न नगर येथे ड्रेनजला भगदाड युवकास दुखापत
नाशिक :- महानगरपालिका हद्दीतील नवीन नाशिक मधील प्रभाग 29 काळे मळा परिसरातील राजरत्न नगर कल्याणी धान्य दुकानासमोरील रोडवरती असलेले ड्रेनेज लाईनचे गोल चेंबर त्यालगत असणारे पावसाळी गटारीचे गोल चेंबर ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सिमेंट काँक्रीटच्या रोडखाली अचानक भुयार तयार झाले आहे. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस कृष्णा मामा काळे,यांना माहिती दिली.कृष्णा काळे यांनी मनपा प्रशासनाचे अधिकारी यांना कळविले असता अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी करून ठेकेदाराला सुचना देण्यात आल्या आहेत.याप्रसंगी कृष्णा काळे नागरिकांनी संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. यातून किती निकृष्ट दर्जाचे काम होत आहे हे लक्षात येते यासाठी नाशिक महापालिकेतील अधिकाऱ्यांनी जे कोणी ठेकेदार असतील त्यांच्या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.अशी मागणी यावेळी करण्यात आली भुयाराच्या खड्ड्यामध्ये बाजूलाच राहणारा एक युवक पडल्याने त्याला दुखापत झाल्याने नागरीकांनी रोष व्यक्त केला.मनपा प्रशासनाला कळवल्याने प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला पाठवून काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे.परंतु यानंतर अशा प्रकारचं काम संबंधित ठेकेदार करणार नाही यासाठी संबंधित ठेकेदाराला पुढील कुठल्याही प्रकारचे काम प्रशासनाने देऊ नये संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments
Post a Comment