मविप्र सांस्कृतिक महोत्सव पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात संपन्न

'मविप्र'मध्ये सुरू करणार नाट्य महोत्सव - ॲड. नितीन ठाकरे
नाशिक :- संस्थेतर्फे यापूर्वी दोन वर्षांतून एकदा होणारा मविप्र सांस्कृतिक महोत्सव आता दरवर्षी होऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर आता संस्थेमध्ये यापुढे दरवर्षी नाट्य महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी घोषणा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केली.
गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (दि.२४) पार पडलेल्या मविप्र सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे माजी विद्यार्थी सुप्रसिध्द युवा गायक हर्षद गोळेसर, प्रतिक सोळसे, सुप्रसिध्द युवा तालवाद्य वादक कु. मोहिनी भुसे यांच्यासह मविप्रचे सभापती बाळासाहेव क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, विजय पगार, प्रसाद सोनवणे, सेवक सदस्य डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके, प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. डी. डी. जाधव, प्रा. डॉ. के. एस. शिंदे, प्रा. विलास देशमुख उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि नटराज पूजन झाले. यानंतर सर्व गटांतील विजेत्या स्पर्धकांनी समूहनृत्य, समूहगीत आणि एकपात्री प्रयोग सादर केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सांस्कृतिक महोत्सव चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच संगीत, गायन, वादन आदी कलांमध्येही विद्यार्थ्यांनी रस घेतला पाहिजे. ताणतणाव घालविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा लाभ होतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांनी दर महिन्याला संस्थेच्या उदाजी महाराज वास्तूसंग्रहालयामध्ये संगीत, गायनाचा कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनीही मनोगतात सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करून विविध स्पर्धांमध्ये असेच यश मिळविण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. डी. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंद अत्रे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हाभरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, कलाशिक्षक, संगीतशिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिथी गायकांच्या सादरीकरणावर थिरकली बच्चेकंपनी
कार्यक्रमादरम्यान हर्षद गोळेसर यांनी स्वरचित गणेश वंदना सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले तर, प्रतीक सोळसेंच्या आवाजातील ‘तेरी दिवानी..’ या गाण्याने प्रेक्षकांनी अक्षरश: सभागृह डोक्यावर घेतले. कु. मोहिनी भुसेच्या संबळ वादनाने सभागृहास अक्षरशः ‘मोहिनी’ घातली. तिघांनी सादर केलेल्या जुगलबंदीत 'ललाटी भंडार' 'खंडेरायाच्या लग्नाला', अंबाबाई लाड लाड ये गं.. आणि 'झालंय झिंग झिंग झिंगाट' या गाण्यांवर 'वन्स मोर' म्हणत विद्यार्थ्यांनी मनसोक्त नाचून आनंद लुटला. 

विजेत्या स्पर्धक  शाळा
समूहनृत्य : प्राथमिक - अभिनव बाल विकास मंदिर, नाशिक ०२ शाळा क्रं.०२ – प्रथम, अभिनव बाल विकास मंदिर, उत्तमनगर – व्दितीय, अभिनव बाल विकास मंदिर, ओझरमिग – तृतीय.
समूहगीत : माध्यमिक - जनता विद्यालय, वडाळीभोई- प्रथम, जनता इंग्लिश स्कुल, सायखेडा – व्दितीय, मराठा हायस्कूल, नाशिक – तृतीय.
समूहनृत्य : माध्यमिक - जनता विद्यालय, सोनांबे -प्रथम, माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर मिग -व्दितीय, श्री.एस. एम. विद्यालय, मखमलाबाद - तृतीय
एकपात्री नाट्यप्रयोग - श्री.सी.एस.एम. विद्यालय, मखमलाबाद- प्रथम, जनता विद्यालय, पवननगर- व्दितीय, के.बी.एच. हायस्कुल, वीरगांव – तृतीय.
समूहगीत : इंग्रजी माध्यम -सनराइज स्कूल-वडनेरभैरव -प्रथम, होरायझन अकॅडमी, आयसीएसई- व्दितीय, होरायझन अकॅडमी,सीबीएससी नाशिक-तृतीय
समूहनृत्य : इंग्रजी माध्यम - होरायझन ॲकॅडमी आयसीएसई, नाशिक- प्रथम, होरायझन इंटरनॅशनल ॲकॅडमी, सिडको- द्वितीय, होरायझन ॲकॅडमी,सिन्नर- तृतीय
वैयक्तिक गीतगायन : उच्च माध्य. - के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत – प्रथम, केटीएचएम महाविद्यालय, नाशिक- द्वितीय, निफाड महाविद्यालय – तृतीय.
समूहनृत्य : उच्च माध्य. : सिन्नर महाविद्यालय- प्रथम, मखमलाबाद महाविद्यालय- द्वितीय, इगतपुरी महाविद्यालय – तृतीय.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला