विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक-पालकांचा वाटा - ॲड. नितीन ठाकरे
फोटो नाशिक : राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, प्राचार्य प्रशांत पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
मविप्र राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनच्या गुणवंतांचा सन्मान
नाशिक :- विद्यार्थ्यांच्या प्रत्येक परीक्षेतील यशामध्ये शिक्षक व पालकांचा महत्वाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशाने हुरळून न जाता याहीपेक्षा अधिक गुण कसे मिळवता येतील व आपली प्रगती कशी होईल, याचा विचार करून भविष्यातील वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत झालेल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या ‘हिवाळी परीक्षा २०२४’चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मविप्र समाज संचलित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमधील सर्व विभागांतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील उपस्थित होते.
प्राचार्य पाटील म्हणाले, आत्मविश्वास व केलेल्या कठीण परिश्रमामुळेच विद्यार्थी आज यशाच्या शिखरापर्यंत पोहचले. सातत्य हिच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आरोग्याचीही काळजी घ्यावी व पुढील परीक्षेसाठी देखील याच पद्धतीने किंबहुना यात वाढ करून घवघवीत यश मिळवावे असे प्रतिपादन प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. महाविद्यालयात कु. कृष्णा चेतन पाटील हिने ९५.१८ टक्के गुण मिळवून राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन मध्ये पहिला क्रमांक मिळवला. तर कु. तन्मय संजय कड याने ९४.९४ टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला आणि कु. निकिता बापू वाघ हिने ९४.३५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील मयुरेश दिंडे, तृप्ती जाधव, मयुरी खैरनार, निशांत खुळे, श्रेया मोंढे, कावेरी राऊल, तनुश्री शिंदे, विद्या टर्ले, पल्लवी थेटे या विद्यार्थ्यांनी डाटा स्ट्रक्चर युजिंग-सी या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळविले. तसेच संगणक विभागातील कृष्णा चेतन पाटील व सायली सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी डाटा स्ट्रक्चर युजिंग-सी या विषयात ७० पैकी ७० गुण मिळविले तर प्रतीक्षा वाघ या विद्यार्थिनीने ऑपरेटिंग सिस्टिम या विषयांत ७० पैकी ७० गुण मिळविले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे संस्थेचा नावलौकिक झाला. पालक व विद्यार्थांनीदेखील या यशामागे तंत्रनिकेतनच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया दिल्या.
या कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख प्रा. बी. एस. देशमुख, प्रा. पी. डी. बोरस्ते, प्रा. पी. जी. देशमुख, प्रा. पी. ए. शिंदे, प्रा. एम. बी. पाटील, प्रा. टी. के. ठाणगे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. एस. ए सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
सर्व विद्यार्थ्यांचे मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment