वंचितांच्या घरोघरी मविप्रने प्रज्वलित केला ज्ञानदीप - ॲड. नितीन ठाकरे


 चौथ्या प्रगतीशील साहित्य संमेलनाचे उदघाटन
नाशिक :- 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तत्व असून, आजवर शोषित, पीडित, वंचित, महिला अशा अनेक गोरगरिब, कष्टकऱ्यांच्या घरोघरी ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम आमच्या संस्थेने केले आहे. आमची संस्था ही सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे चालवीत असून सत्यशोधक चळवळीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन 'मविप्र'चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ आणि एकटा नाशिकद्वारे आयोजित चौथ्या प्रगतीशील साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नाशिकमधील मविप्रच्या आयएमआरटी महाविद्यालयात रेवरंट नारायण वामन टिळक साहित्यनगरीत तथा कालकथित शंकर बोराडे विचार मंचावर रविवारी (दि.२९) साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
या एकदिवशीय साहित्य संमेलनाची सुरुवात नऊ वाजून 45 मिनिटांनी IPTA नाशिक या संस्थेच्या गायकांनी सादर केलेल्या गीतांनी झाली. ज्याच्यामध्ये तोड बंधन, साऊ, अशी एक शिवाय एक गाणी सादर झाली त्यानंतर बरोबर दहा वाजता नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक राजा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून या संमेलनाचे उद्घाटन झाले असे राजा गायकवाड यांनी जाहीर केले. यावेळी उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना गायकवाड असे म्हणाले की, रिडल्स एन हिंदूइझम हे पुस्तक आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर त्यांना लिहिता आले नसते. इतकी सामाजिक सहिष्णुता जातीय सलोखा आणि एकूणच समाजाचा समतोल ढासळलेला आहे. याबद्दल चिंता करण्यासारखी परिस्थिती राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येते, याबद्दलचे मोठे मौलिक चिंतन त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. 
     
यावेळी उपस्थित त्यामध्ये कॉम्रेड राजू देसले यांनी शुभेच्छा पर भाषण केले कष्टकऱ्यांचा लढा साहित्य तून मांडणारे साहित्य हेच खरे साहित्य होय असे त्यांनी उद्गार काढले आणि प्रगतिशील लेखक संघाच्या पुढील वाटचालीस मनापासून सदिच्छा असल्याचे गौरव उद्गार काढले त्याचबरोबर नाशिक येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मनीषा जगताप यांनी सुद्धा कार्यक्रमाला शुभेच्छा देताना स्त्रियांची उपस्थिती स्त्रियांना मध्यवर्ती ठेवून केलेला कार्यक्रम आणि त्याचं आगळे वेगळे वैशिष्ट्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 
      उद्घाटन क्षेत्रामध्ये 'प्रबोधन' स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . स्मरणिकेचे संपादक प्रमोद अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील आणि परिसरातील प्रोग्रेसिव्ह घडामोडी प्रोग्रेसिव्ह पुस्तके लेखक कवी पत्रकार चित्रकार यांचा प्रगतिशील सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला उपस्थित असलेल्या विविध लेखकांना आणि त्यांच्या साहित्य कृतींचा या संमेलनामध्ये सन्मान करून त्यांना स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
या संमेलनाच्या स्थळी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गेल्या 90 वर्षात देशभरात निर्माण झालेल्या अनेक लेखकांची छायाचित्रे आणि त्यांनी केलेल्या वांग्मयीन कारकिर्दीचा आढावा घेणारी पोस्टर्स बॅनर्स सभागृहामध्ये लावण्यात आली होती जी आलेल्या सर्व उपस्थित श्रोत्यांचे वाचकांचे कार्यकर्त्यांचं लक्ष वेधून घेत होती ज्यामध्ये मुन्सी प्रेमचंद पासून सहा जत हसन म्हणतो मुल्कराज आनंद सज्जाद जहीर शंकर बदायुनी, शैलेंद्र, संगीतकार सलील चौधरी पासून तर आजचे प्रगतिशील लेखक संघाचे सचिव सुखदेव शिरसापासून ते राकेश वानखेडे पर्यंत यांची पोस्टर्स यावेळी सभागृहामध्ये लावण्यात आलेली होती. शिलकेशा आहिरे यांनी प्रगतीशील लेखक मुंशी प्रेमचंद कॉम्रेड शरद पाटील आणि बाबुराव बागुल यांच्या छायाचित्रांची रांगोळी यावेळेस सभागृहाच्या बाहेर काढली होती. यावेळी आलेल्या सर्व उपस्थित यांचे लक्ष वेधून घेणारा मी प्रगतीशील हा सेल्फी पॉईंट ठरला. 
प्रमोद अहिरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेची भूमिका प्रल्हाद पवार यांनी मांडली. यावेळी मीनाज बेग मिर्झा यांनी स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. या संमेलनामध्ये उत्स्फूर्तपणे पुस्तक स्टॉल्स लावण्यात आलेली होती.

जात, वर्ण, वर्ग, स्त्री दास्य, सामाजिक राजकीय विषमता ही प्रचंड भीषण होण्याच्या काळामध्ये सत्यशोधकी विचारांची कास धरणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण देशी पर्यावरणवादी स्त्रीवादी दलित आधुनिक ग्रामीण शहरी अशा विविध कप्पेबंद पद्धतीने विद्यापीठांमध्ये साहित्याचा अभ्यास केल्याने अभ्यासकांची एक प्रकारची सोय झाली मात्र त्यातून मूलगामी चिंतन आणि अक्षय स्वरूपाचं वाङ्मय मराठी साहित्यात निर्माण झालं नाही.
- वंदना महाजन, साहित्यिक

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला