मोरया डेंटल हाॅस्पीटलचा धुळे प्रांताधिकारी रोहन रघुनाथ कुवर यांच्या हस्ते शुभारंभ


 
धुळे :- साक्री  तालुक्यातील  जैताने  या गावात मोरया हास्पिटल चा  शुभारंभ मोठ्या उत्साहात  धुळ्याचे  प्रांताधिकारी रोहन रघुनाथ कुवर,  यांच्या  हस्ते  संपन्न झाला.  या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली  बाजीराव पगारे, पं स  सदस्य साक्री या होत्या.यावेळी  प्रमुख  पाहुणे म्हणून श्री मयुर सोणवणे,पोलीस उपनिरीक्षक    सुदाम भलकर, संचालक  सुतगिरणी आर पी कुवर, धनगर  समाजाचे  जेष्ठनेते अरुण दादा  शिरोळे, उत्तर महाराष्ट्र  प्रमुख  यशवंत सेना, धिरज पाटील, नारायण भलकार,राहुल  भलकार,अभियंता, लक्ष्मीकांत शहा, चेअरमन पतपेढी, राजेंद्र पगारे,  आर व्ही निकम,संचालक नि ले  प  धुळे, सुखदेव पगारे, गोविंद देवरे,  मा,सरपंच सुरपान नरेंद्र  तोरवणे, अनिल ढिवरे, अध्यक्ष मानव संरक्षण  समिती नंदुरबार, विषेश  मान्यवर डॉ नरेंद्र  शिरसाट, डॉ प्रकाश गवले, डॉ. हरी ठाकरे, डॉ.  बि व्ही खलाणे, डॉ  एल डी पाटील, डॉ.रमाकांत शिरोडे,मुकेश रेलन, आदिंसह  मान्यवर  व्यासपीठावर उपस्थित होते. 
उपस्थित मान्यवरांचे  स्वागत प्रमोद रामदास  पेंढारकर,सह लेखापरीक्षक अधिकारी धुळे, ज्ञानेश्वर  पेंढारकर,डॉ.भुषण पेंढारकर,   
डॉ. मधुसुदन पेंढारकर यांनी केले.तसेच जैताने  ग्रामपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी रोहन कुवर, याचा सत्कार आशोक मुजगे, यांनी केला.  या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थेचे  पदाधिकारी मित्र परीवार नातेवाईक महिला  भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
कार्यक्रम चे  सुत्रसंचालन प्रा.गोरख  धनगर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन