अंमली पदार्थ विरोधात शिवसेना संपर्क प्रमुख गणेश कदम यांचे नाशिक पोलिस आयुक्तांना निवेदन
खबरदार! शाळा, महाविद्यालय आवारात अमली पदार्थांची विक्री कराल तर
नाशिक :-(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, यांनी महाराष्ट्रात मोठ्या शहरांत तसेच शाळा व महाविद्यालय आवारात अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठीची मोहीम हाती घेतली असुन या पार्श्वभुमिवर नाशिक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय आवारात अमली पदार्थ आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठीचे निवेदन शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,यांची भेट घेऊन दिले. नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठ्या शहरातील महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांची अनाधिकृत विक्री केली जात असल्याने सदर बाब ही अतिशय गंभीर असुन विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षित रहावे आणि अमली पदार्थांच्या अनाधिकृत विक्रीला आळा बसण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तात्काळ सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठीचे निवेदन पोलीस आयुक्त यांना दिले. सदर निवेदनात कदम यांनी नाशिक शहरांमध्ये अशा प्रकारचे कुठलेही पदार्थ आढळल्यास संबंधितांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तसेच सदर बाबतीत जनजागृती करण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम व जनजागृती शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. नाशिक शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिकाधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळं लहान मुलांचे यात अडकण्याचे प्रमाणही वाढत चाललं आहे. अशातच अमली पदार्थांच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून आत्तापर्यंत ड्रग्सच्या आहारी गेलेल्या तरुणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये सिगारेट पान मसाला, गुटखा यासारख्या व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत असून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय तसेच सार्वजनिक ठिकाणावर धूम्रपान बंदी (Drugs) लागू करण्यात आली आहे. मात्र या गुटखा आणि धूम्रपान बंदीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.असे देखील कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.
शाळा, महाविद्यालयांकडे लक्ष देणे आवश्यक
महाराष्ट्र राज्यात शासनाने 18 वर्षांखालील बालकांना सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी केलेली आहे. काही टपरीचालक मात्र ही उत्पादने 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन बालकांना विक्री करत आहेत.नाशिक शहरातील पानटपरी, गल्लीबोळ विशेष विशिष्ट ठराविक भागात रिक्षातून मालपुरवठा केला जातो.काही शाळेबाहेर विक्री करत असल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील तरुणही अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून आता थेट राज्याच्या गृहराज्यमंत्री यांनीच याकडे लक्ष घातले असल्याने पोलिसांसह प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज असून शहर ड्रग्सच्या विळख्यात जाण्यापूर्वी रोखणे महत्वाचे असल्याचे निवेदन दिल्यानंतर गणेश कदम यांनी प्रसिद्धी प्रमुख शी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment