सुरगाणा शहरात शहीद स्मारकाचे लोकार्पण
सुरगाणा :- शहरातील हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे शहिद स्मारक युवा पिढीला देशभक्ती, देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देत राहिल असे प्रतिपादन शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांनी हुतात्मा स्मारक लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सुरगाणा येथे केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी सैनिक जिल्हाध्याक्ष विजय पवार, सचिव फुलचंद पाटील, रवींद्र शार्दूल, सुरगाणा तालुकाध्याक्ष काशिनाथ गायकवाड, संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, नगराध्यक्ष भरत वाघमारे, उपनगराध्यक्ष माधवी थोरात, मुख्याधिकारी सचिन पटेल, पोलीस निरीक्षक राहूल मोरे, नायब तहसिलदार मनोहर वाघमारे,उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी चौधरी यांनी सांगितले की, सैनिक हेच खरे देशाचे रक्षणकर्ते आहेत.सैनिकांचा जीवन प्रवास हा खुपच खडतर असतो.सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्या मुळेच आपण सुखाची झोप घेतो.आपल्या भारतभूमीचे रक्षण करण्यासाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज आहे. माजी सैनिक भरत खांदवे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आपल्या भारत भूमीच्या रक्षणार्थ शहिद झालेल्या जवानांचा अंत्यविधी हा स्मशानभूमीत होत नसतो तर शासनाच्या मोकळ्या जागेत सन्मानाने केला जातो. भारता तुलाच आम्ही देव मानतो. भारतमातेला कोणताही जात, धर्म, पंथ नसतो तर विविधतेत एकता सामावलेली आहे त्यामुळे गर्वाने जयहिंद म्हटले जाते. देशसेवा करण्याची संधी मिळते त्यामुळे तरुणांनी आज सैन्यात भरती झाले पाहिजे. आज पूर्वीची ढाल तलवारीची लढाई राहिलेली नाही त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय लढाई केली जाते. यावेळी नगरसेवक सचिन आहेर, सचिन महाले, पुष्पाताई वाघमारे, राधाबाई वाघमारे, प्रमिला भोये, अरुणा वाघमारे, रंजना लहरे, राजूबाबा शेख, मालतीबाई खांडवी, रमेश थोरात, भगवान आहेर, जिल्ह्यातील माजी सैनिक रवींद्र शार्दूल, एम. पी. वाघ, भारत खांदवे, प्रभाकर पगार, नितीन हिरे, विजय पगार, हिरामण काळे, जयवंत बोडके, उत्तम बुणगे, गणपत कोरडे, मनोहर भोसले, विश्वनाथ कावळे, संतोष धुम, रेवनाथ जगताप, भिका इचाळे, दत्तात्रेय बागुल, विजय पाटील, राजाराम देशमुख, शिवाजी निसाळ, गणपत जाधव, वैभव भार्गवे, हिरामण पिंगळ, गजानन पळशीकर, विजय बागुल, दिपक रोकडे, शेख इम्तियाज, सतिष ठाकरे, राजेंद्र निकम, शांताराम पिंगळे, शांताराम थोरात, दत्तू चव्हाण, पांडुरंग महाले, भागवत जाधव, गोपाळ गायकवाड, शिवराम चौधरी, वीर पत्नी लताबाई गावित सह सुरगाणा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment