मविप्र दिनदर्शिका २०२५'चे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक प्रकाशित सन २०२५ च्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाप्रसंगी मविप्रचे पदाधिकारी, संचालक व शिक्षणाधिकारी
नाशिक :- येथील मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक प्रकाशित सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयात पार पडले.वैविध्यता आणि नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेऊन मविप्र संस्था सभासद, विद्यार्थी आणि समाजासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्यातील एक म्हणजे दिनदर्शिका, गेल्या तीन वर्षांपासून संस्था दिनदर्शिका प्रकाशित करीत आहे. मागील वर्षांत भारतातील संतांचा परिचय व जीवनकार्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. यावर्षी मविप्र संस्थेचा इत्यंभूत इतिहास, संस्था उभारणीच्या काळातील पडद्यामागील धुरीण, पंचांग, दिनविशेष, मविप्रचा शतकोत्तर शाखाविस्तार आणि शैक्षणिक गुणवत्तावाढ व विकासासाठीच्या उपक्रमांची माहिती यात दिली आहे.दिनदर्शिकेच्या संपादनासाठी 'मविप्र'तील इतिहासाचे प्राध्यापकवृंद तसेच शैक्षणिक वारसा संग्रहालयाची मदत झाली. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे, इगतपुरी तालुका संचालक ॲड. संदीप गुळवे, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. अजित मोरे, प्रा. कैलास शिंदे यावेळी उपस्थित होते.संस्थेचे सभासद, विविध शाखा आणि हितचिंतक यांना दिनदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment