स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतलीे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती
यंदाचे वर्ष हे भारतभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहेत त्यानिमित्त शाळेतर्फे एक अनोखा उपक्रम आयोजित केला गेला.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी चांदवड येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुरातन वास्तू रंगमहाल येथे भेट देत अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस आणि कर्तृत्ववान इतिहासात उजाळा दिला.
हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समाधान बागल, व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाघ, यांनी सर्वांना अत्यंत मोलाचे सहकार्य केले. विशेष परिश्रम घेत या मुलांना चांदवड म्हणजेच होळकर नगरीचा इतिहास आणि राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली
होळकर वाडा ही पुरातत्त्व वास्तू असून मातोश्री अहिल्यादेवींनी उपराजधानी म्हणून चांदवडची निवड केली होती. रंगमहालात गेल्यानंतर होळकर नगरीचा इतिहास विद्यार्थ्यांना मा.श्री.समाधान बागल यांनी समजावून दिला. अहिल्यादेवींचे प्रशासकीय गुण, आत्मविश्वास , धारिष्ट्य, हे आजच्या काळामध्ये आपण आत्मसात करणे गरजेचे आहे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या गजराने संपूर्ण होळकर वाड्याचा परिसर दुमदुमला. एकूणच ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका अलका चंद्रात्रे, यांनी शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. क्षेत्रभेटीसाठी मा.मुख्याध्यापिका उज्वला माळी, पर्यवेक्षिका शुभदा टकले यांचे मोलाचे मार्गदर्शन व शाळेचे शिक्षक चित्रा येवले, प्रिया पवार, जितेंद्र गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment