गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शिवसेना संपर्कप्रमुख गणेश कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
ना.रोड :- शिवसेनेचे संपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जयभवानीरोड कदम मळा निवासस्थानी गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम, यांची सदिच्छा भेट.
याप्रसंगी समस्त कदम परिवाराच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी करत स्वागत करण्यात आले.गणेश कदम यांच्या परिवारातील महिलांनी गृहराज्यमंत्री यांचे औक्षन केले, मंत्री योगेश कदम यांना क्रेनच्या साह्याने भव्यदिव्य पुष्पहार घालण्यात आला तसेच कदम परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक लोकसभा मा.खासदार हेमंत गोडसे, शिवसेना, छत्रपती युवा सेना,छत्रपती फाउंडेशन,श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थान पदाधिकारी गणेश कदम समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री योगेश कदम, म्हणाले की गणेश कदम शिवसेना पक्षासाठी वाहून घेणारे नाशिकचे नेतृत्व असून आमचे वडील शिवसेना नेते रामदास भाई कदम यांचे अत्यंत विश्वासू आहेत मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नाशिक शहरात आलो त्यामुळे मी गणेश कदम यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी आलो आहे. गणेश कदम, यांचे एक शिवसैनिक म्हणून काम अतिशय चांगले असून भविष्यात त्यांची पक्षात उत्तम प्रगती होईल याची मला खात्री आहे. मी गणेश कदम, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
गणेश कदम यांच्या निवासस्थानी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कदम परिवारातील लहान पासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत जवळपास सर्वांशीच आपुलकीने चर्चा केली. किमान दीड तास कदम परिवाराला वेळ दिला.त्यामुळे उपस्थित सर्वांनीच मंत्री योगेश कदम यांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment