वाचाळवीर संजय राऊत माफी मागा - गणेश कदम
नाशिक:- महाकुंभात नागा साधूंना पहिला मान अमृतस्नान करण्याचा आहे ,अशा नागा साधूंना अस्वस्थ आत्मा म्हटल्याबद्दल संजय राऊत यांनी हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल प्रथमतः संपुर्ण हिंदू समाजाची माफी मागावी,
राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बद्दल बोलताना संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे, शिंदे साहेबां बद्दल बोलताना नागा साधूंना अस्वस्थ आत्मा म्हटले, संजय राऊत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे अस्वस्थ आत्मा कोणाची आहे. तुमच्या याच वाचाळपणामुळे उबाटा शिवसेना पक्षाची आज काय अवस्था झाली हे उभा महाराष्ट्र बघतोय,
खऱ्या अर्थाने या महाकुंभा मध्ये तुम्हालाच नागा साधू सोबत नागा होवुन त्या ठिकाणी बसण्याची गरज आहे त्यामुळे किमान तुमच्या लकवा मारलेल्या बुध्दू मध्ये थोडी बुध्दी तरी येईल स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिचं वाकून हे संजय राऊत यांनी आता तरी बंद करावे आणि स्वतःच्या वाताहात झाल्या पक्षाकडे लक्ष द्यावं - शिवसेना सहसंपर्कप्रमुख - गणेश कदम
Comments
Post a Comment