ज्ञानाई कॉम्प्युटर्सचे जयवंत जंगम महाराष्ट्र ज्ञान महामंडळा कडून सन्मानित


सुरगाणा :- शहरातील ज्ञानाई कॉम्प्युटर्सचे संचालक जयवंत जंगम यांनी केलेल्या वर्ष २०२४ मधील MKCL कृत विविध कोर्सेसचे प्रवेश, प्रशिक्षण, परीक्षा व प्लेसमेंट या बाबतीत संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या कार्यकारी संचालिका विना कामथ यांच्या हस्ते सत्कार करून जंगम यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. 
ग्रामिण भागात अनेक अडचणींवर मात करून MKCL नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पाटील व मकरंद बेलगावकर यांच्या मार्गदर्शनानेच हे लक्ष्य गाठता आल्याची ज्ञानाई चे संचालक जंगम यांनी कबुली दिली. नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर, नाशिक येथे जिल्ह्यातील सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची वार्षिक सभा नुकतीच पार पडली असून संस्थेने २०२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये MS-CIT, KLiC कोर्सेस प्रवेश व विद्यार्थ्यांना करियर इन्क्लीनेषण टेस्ट व मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व कौशल्यावर आधारित गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्ञानाई कॉम्प्युटर्स या संस्थेने ग्रामीण भागामध्ये गेली २५ वर्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे संचालक जयवंत जंगम सर यांचा सन्मान करण्यात आला.सभेसाठी एम.के.सी. एल चे वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पाटोदी, अमित रानडे, नटराज सर, संतोष चौघुले व सर्व एस.बी.यु. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व MKCL अधिकृत केंद्र संचालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन