नवीन शासनमान्य मद्य विक्री परवाने वितरणास बंदी करावी नरसिव्हा फांऊडेशन संस्थेची मागणी
नाशिक :- नाशिक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवत, नरसिव्हा फांऊडेशन अध्यक्ष समाधान शिरसाठ यांनी नवीन मद्य विक्री परवाने बंद करण्याची मागणी केली आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यात मद्यपान करून वाहन चालवल्याने जिवितहानी होतच आहेत.तसेच मद्य प्राशन करून,कौटुंबिक वादविवाद, गुन्हेगारी कृत्य त्यामुळे अनेक महिलांचा सुखी संसार मोडल्याच्या घटना घडत आहेत सद्यस्थितीत वैध तसेच अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री होत आहे.त्यातच नवीन मद्य विक्री परवाने दिल्यास मोठ्या प्रमाणावर युवक महाराष्ट्रातील नागरिक व्यसनाधीन होतील यामुळे नवीन शासनमान्य मद्य विक्री परवाने वितरणास बंदी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment