केटीएचएमच्या गणित विभागात ग्राफ थियरी विथ पायथॉन कार्यशाळेचे आयोजन
नाशिक :- मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील गणित विभागानी 'ग्राफ थेरी विथ पायथॉन' या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.व्ही.आर.निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एस.काळे , ओझर महाविद्यालयाच्या प्रा. रत्नावली टिळक, गणित विभाग प्रमुख डॉ.अंजली शिंदे, कार्यशाळा समन्वयक प्रा. श्रीमती विभावरी धोकरट, प्रा. डॉ. चेतन शिरोरे उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ.व्ही .आर निकम यांनी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग व गणिताच्या विविध अंगांचा अभ्यास करण्यास उत्तेजन देईल व त्यांच्या व्यावसायिक यशासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० मध्ये नवीन अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकांमध्ये ग्राफ थेरी विथ पायथॉनचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राफ थेअरी हे गणितातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून पायथॉन सारख्या शक्तिशाली प्रोग्रामिंग भाषेचा उपयोग करून विद्यार्थ्यांना या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजावता येतील, असे ॲड. नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी प्रा.बी.एस.गांगुर्डे, प्रा.एस. बी. जमदाडे, प्रा .के. वी. वाजे, प्रा.एस. आर.शिंदे, प्रा.पी.पी. ठाकरे, प्रा . के. एल.मानकर, पी. एस.भंडारी, जी. डी. गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी साक्षी सिंग व नीलम कुमावत यांनी सूत्रसंचालन, तर प्रा.व्ही.टी.धोकरट यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment