महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती महामंत्री एन डी गावीत यांच्या हस्ते बाऱ्हे परिसरात विविध विकास कामांचे उद्घाटन
सुरगाणा :- तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजय कुमार गावीत, यांच्या निधीतून आदिवासी विकास विभाग आदिवासी उपयोजना क्षेत्र ५०/५४ ह्या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेले कामांचा शुभारंभ
यामध्ये १) जाहूले पैकी मोहाचापाडा ते बोंबले वस्ती, २) वाखनघी फाटा ते रताळीपाडा, ३) खोबऱ्याचापाडा (गुरटेंभी) ते ठाणगाव रस्ता, ३) देवळीचापाडा ते भेनशेत, ४) केळावण ते चौधरी वस्ती, ५) आंबेपाडा ते निकुळे/घांगळे वस्ती आदी रस्ता कामाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती महामंत्री एन डी गावीत,यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उद्घाटनप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र निकुळे, सुनिल भोये,सामाजिक कार्यकर्ता देविदास गावीत,माजी सरपंच परशराम वार्डे, उपसरपंच हर्षवर्धन गावीत, रमेश माळघरे, जयराम भोये, कैलास वाघेरे, चंदर चौधरी,दिनेश जाधव,नारायण हिंडे, जयप्रकाश महाले, सुरेश घांगळे, मनोहर जाधव हेमराज महाले, कैलास वाघेरे यांच्यासह बाऱ्हे परिसरातील कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment