प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांची विद्यापीठ समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड

नाशिक :- समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजकार्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि आंतरविद्याशाखीय विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांच्या आदेशाने ही निवड झाली आहे. 

डॉ विलास देशमुख यांची आजपर्यंत ३० पुस्तके प्रकाशित असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ३० पेक्षा जास्त संशोधन पेपर संपादीत लेख प्रकाशित केलेले आहेत. याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक परिषदांमध्ये सहभाग नोंदविला असून, आजवर त्यांनी दहा हजारपेक्षा जास्त सेवकांचे ‘वर्तन विकास आणि कार्यात्मक कौशल्य’ या विषयावर प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना समाजकार्य या विषयातील २७ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, त्यांनी विविध महाविद्यालये आणि समुदायांमध्ये सामाजिक शैक्षणिक व मानसशास्त्रीय विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. त्यांच्या या संशोधनात्मक ज्ञानाचा समाजकार्य शिक्षणासाठी नक्कीच फायदा होईल. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी बी मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरीचे संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, सर्व शिक्षणाधिकारी, सर्व शाखाप्रमुख आणि सेवकांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला