मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

इंदिरानगर :- भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे, यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अनवधानाने दाखल केलेली तक्रार डॉ राहुल धिरेंद्र सिंग,वय ३४ खाजगी नोकरी प्रोफेसर राहणार प्लाॅट नंबर ४ साई दत्त को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी आनंद नगर पाथर्डी फाटा यांनी मागे घेतली आहे.तसा जबाब त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतः उपस्थित राहुन दिला आहे. दिनांक ०५/०८/२०२५ रोजी इंदिरानगर परिसरातील स्वामी समर्थ बँकेच्या समोर डेकेअर शाळेच्या रस्त्याजवळ डॉ राहुल धिरेंद्र सिंग यांची अक्टीव्हा स्कुटर,माजी नगरसेवक यशवंत केशव निकुळे,यांच्या एर्टीगा कार मध्ये किरकोळ अपघात झाला होता.दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर याप्रकरणी डॉ राहुल धिरेंद्र सिंग,यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनसी तक्रार १२६३/२०२५ दाखल केली होती.सदरची तक्रार मी अनवधानाने दाखल केली होती आम्ही आपसात बसून वाद मिटवला आहे. याप्रकरणी माझी कुठलीही तक्रार नाही असं डॉ राहुल धिरेंद्र सिंग यांनी जबाबात नमुद केले आहे.किरकोळ अपघात,शाब्दिक वाद गैरसमजातून दाखल तक्रार मागे घेतल्याने याप्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

Comments

Popular posts from this blog

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन