राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगारात जागतिक आदिवासी दिन साजरा
इगतपुरी :- आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्य परिवहन विभागाच्या इगतपुरी आगार येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी आगार व्यवस्थापक अहिरे साहेब,यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले.अधिकारी सानप साहेब, ढकाणे साहेब, कोरडे साहेब, तळपाडे साहेब,नाठे साहेब,यांच्या उपस्थित जागतिक आदिवासी दिनानिमित्त विवीध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी आदिवासी नेते संजय गातवे,यांच्या उपस्थितीत असंख्य आदिवासी बांधव तसेच सहकारी कर्मचारी तसेच ज्येष्ठ कर्मचारी वृंद तसेच इगतपुरी आगारातील नामदेव जाधव,शिवाजीराव डगळे, संतोष धोंगडे,मदन धोंगडे,बाळू गभाले,रामदास येडे, कैलास भोईर,योगेश काळे, पंकज दाणी,ज्ञानेश्वर भांगरे, भगवान बुले,गोविंद गोहिरे, दशरथ जोशी, आदींसह इगतपुरी आगार कर्मचारी वृंद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment