इंदिरानगरात साकारला हुबेहुब कामाख्या मंदिराचा देखावा भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

नाशिक इंदिरानगर :- भाजपा प्रणित इंदिरानगर उत्सव समितीला यंदा11 वर्ष पूर्ण होत असून मंडळाच्या या वर्षानिमित्त पृथ्वीवरील ५१ शक्तीपीठां पैकी पवित्र आणि सर्वात जुने मानले जाणाऱ्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथील माँ कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गणेशोत्सवात हा देखावा भाविकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
इंदिरानगरातील भाजप प्रणित उत्सव समितीची स्थापना 2014 साली झाली आहे. इंदिरानगर येथील बापू बंगल्यासमोरील माजी नगरसेविका सुप्रिया खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात श्री कामाख्या देवीच्या मंदिराचा प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला आला आहे.मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. खोडे म्हणाले की,समितीत एकुण 100 पेक्षा जास्त महिला व ज्येष्ठ नागरिकांसह सभासद संख्या असून सर्व समाजातील लोक सदस्य आहेत.यंदा गिरीश पाठक हे अध्यक्ष आहेत तर स्वागत कार्याध्यक्ष म्हणून प्रविण नागरे,तसेच देखाव्याचे कामकाज माजी नगरसेविका सुप्रिया खोडे, निखिल खोडे यांनी पाहिले.देखरेख उपाध्यक्ष उमेश जाधव,दीपक लोंढे सह जेष्ठ सभासद यांनी केली.गेल्या 11 वर्षात समितीने आता पर्यंत विविध धार्मिक,पौराणिक देखावे सादर केले आहेत.
11 वर्षांच्या प्रवासात मंडळाने इंदिरानगर गणेशोत्सवाला वेगळे वैशिष्ट्य प्राप्त करून दिले आहे.शहरातील व राज्यातील देशपातळी वरील नैसर्गिक आपत्तीत नेहमीच आर्थिक व वस्तु रुपात मदतीचा हात दिला आहे.या वर्षी मंडळाने गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचा देखावा साकारला आहे. हे शिल्प बंगाल येथील वास्तुविशारद यांनी 50 फूट लांब,50 फूट उंच देखाव्या साठी 20 हजार बाबू,8 हजार मीटर कापड,10 हजार बल्ल्या,50 हजार फूट बॉटम पट्टी वापरली आहे.15 कारागीर यांनी वेळेत भव्य,आकर्षक मंदिराचा देखावा उभारला आहे.दहा दिवस महिलां साठी विविध उपक्रम घेतले जाणार आहे.यासाठी जयंत लाळे,संकेत खोडे, अँड,मंदर अवचट,शुभम गुंजाळ,ओम उगले आदी पदाधिकारीनी विशेष परिश्रम घेतले आहे. माँ कामाख्या किंवा कामेश्वरी ही कामना पूर्ण करणारे प्रसिद्ध शक्ती पिठ आहे.हे  प्रसिद्ध मंदिर ईशान्य भारतातील आसाम राज्याची राजधानी असलेल्या गुवाहाटीच्या पश्चिम भागात असलेल्या निलांचल टेकडीच्या मध्य भागी आहे.माँ कामाख्या देवालय हे पृथ्वीवरील ५१ शक्तीपीठांपैकी सर्वांत पवित्र आणि सर्वात जुने मानले जाते. हे भारतातील व्यापकपणे प्रचलित असलेल्या,शक्तिशाली तांत्रिक शक्तीवाद पंथाचे केंद्रबिंदू आहे.कामाख्या मंदिर हे सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते. आवाहन मंडळाचे हे 11 वे वर्ष असून नेहमीच विधायक आणि पौराणिक देखावे मंडळाने साकारले आहेत.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन