बीज राखी'तून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची प्रेरणा - ॲड.नितीन ठाकरे

केटीएचएम महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या 'बीज राखी' उपक्रमाच्या उदघाटनानंतर राख्या न्याहाळताना ॲड.नितीन ठाकरे,समवेत मान्यवर

केटीएचएम माहविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या

नाशिक :-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)केटीएचएम महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेला 'बीज राखी' उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या उपक्रमामुळे समाजामध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याविषयी जनजागृती निर्माण होण्याची प्रेरणा मिळेल. पर्यावरण, जैवविविधता, दुर्मिळ व प्रादेशिक वनस्पतींच्या बीज संरक्षणाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचेल,असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात "बीज राखी" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाचे उदघाटन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. उदघाटनप्रसंगी बोलतांना बीज राखी या संकलपनेचे व उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमास मविप्रचे संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, डॉ. सयाजीराव गायकवाड, रमेश पिंगळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे उपस्थित होते. या उपक्रमात एकूण ६३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सरचिटणीस ॲड. ठाकरे, प्रमुख पाहुणे व प्राचार्यांनी विद्यार्थिनींनी बनविलेल्या बीज राख्या न्याहाळत कौतुक केले. विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. खैरनार यांनी प्रास्ताविक केले व हा उपक्रम राबविण्यामागचा हेतू सांगितला. वैशाली कोकाटे, सुजाता मगदूम व मयुरा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. उपक्रम यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. आर. के. पाटील, रमाकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले, डॉ. विठ्ठल सोनवणे, डॉ. सोनाली देवरे व इतर सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन