संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाप्रमुख पदी प्रफुल्ल वाघ यांची नियुक्ती
पुणे :- पुणे येथे झालेल्या पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्हा प्रमुख पदी प्रफुल्ल वाघ, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वाघ हे गेल्या १३/१४ वर्षापासून मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, व पुरोगामी चळवळीचे काम सक्रिय राहून करत आहेत.अनेक आंदोलने, तसेच निवेदन देऊन सरकार दरबारी अडकलेले काम तडीस घेऊन गेलेले आहेत.कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख ही जबाबदारी त्यांनी पार पडली आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर,मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे,यांच्या हस्ते नाशिक जिल्हाप्रमुख म्हणून प्रफुल्ल वाघ,यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रफुल्ल वाघ,यांना यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्राथमिक सदस्य नाशिक शहराचे कार्याध्यक्ष शहराचे महानगर अध्यक्ष,अशी जबाबदारी देण्यात आली होती.आता जिल्हाप्रमुख या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहून मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,चा विचार कधीही न सोडता त्यावर सातत्याने काम केल्यामुळेच ही जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे.सर्व प्रमुख पदाधिकारी मित्रपरिवाराच्या वतीने वाघ यांना नवीन जबाबदारी बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment