इंदिरानगर येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहिमेंतर्गत तपासणी शिबिर सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

इंदिरानगर :- गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या संकल्पनेतून‘श्रीगणेशा आरोग्याचा’ही विशेष मोहीम राबवलीजात आहे. इंदिरानगर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मित्रमंडळ युवा मंच श्री रथचक्र सोसायटी वीर सावरकर चौक,संस्थापक तथा माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे यांच्या सहकार्याने व एचसीजी मानवता कॅन्सरच् सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,सरचिटणीस सुनिल देसाई,मंडल अध्यक्ष उदय जोशी,डॅा.वैभव महाले,यांचा हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांनी ४५० पेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करून मोफत सल्ला दिला.तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,यांनी विविध शासकीय आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याची माहिती दिली. शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सुनिल राऊत,संकेत खोडे,अवधुत कुलकर्णी, सुनिल खोडे,अरुण मुनशेट्टीवार,सुरेश खोडे,कमलाकर खोडे,गणपत खोडे,राजेंद्र खरात,रोहीत खोडे, ऋषिकेश कुंदे,आदित्य झोले,वेदांत ठाकुर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन