स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीवर आधारित श्री गणेश आरास
नाशिक इंदिरानगर :- येथील अभ्यंकर कुटुंबियांनी साकारलेली घरगुती गणेश सजावट तिच्या विषय वस्तूमुळे आणि सादरी करणामुळे विशेष दाद मिळवत आहे. ही सजावट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना अर्पण करण्यात आली असून त्यांचे जन्मस्थळ भगूर येथील घराची हुबेहूब प्रतिकृती म्हणून मांडण्यात आली आहे. ही सजावट धनंजय अभ्यंकर,मंजिरी अभ्यंकर आणि त्यांचा मुलगा यांनी तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत सातत्याने मेहनत घेऊन साकारली आहे.या सजावटीची खासियत म्हणजे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.शाडू मातीचीमूर्ती आणि सजावटीसाठी वापरलेले साधे पण कल्पक साहित्य ६ बाय ४ आकाराचे २१ पुढे, चार्ट पेपर्स/बाउंड पेपर्स २०, अॅक्रेलिक रंग व ग्लूगनयांच्या सहाय्याने ही आकर्षक सजावट उभारली आहे. अभ्यंकर कुटुंबियांच्या मते, ही सजावट ही केवळ गणरायाला अर्पण नसून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अदम्य राष्ट्रभक्ती,त्याग आणि विचारांचा सन्मान करण्याचा एक प्रयत्न आहे.
Comments
Post a Comment