सकल मराठा परीवार तर्फे"एक राखी सैनिकांसाठी" उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा



नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, , जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९ पंचक, जनता विद्यालय पंचक या ठिकाणीं "एक राखी सैनिकांसाठी" हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हा उपक्रमात सकल मराठा परिवार मागील चार वर्षापासून राबवत आहे . परिवाराच्या वतीने पाठवलेल्या राखी भेटल्यानंतर बटालियन कडून आभार पत्र येते व यात अनेक सैनिक बांधव आपल्या भावना व्यक्त करतात यावेळी समन्वयक खंडू आहेर,यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.आपण सैनिकांपर्यंत पोहचू शकत नाही.जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेटकार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्वीगुणीत होणार आहे.तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत आपल्या साठी उभे असता त्यांच्यामुळे आपले सण ,उत्सव जोराने साजरे होतात पण त्यांना त्यात सहभागी होता येत नाही तर आपल्या समाजचे त्यांच्या प्रती काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवरच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला जातो .यावेळी 20 ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात राखी,ग्रिटिंग व मेसेज कार्ड पाठवण्यात येत आहे.ज्यावेळी या राख्या सीमेवर सैनिक बांधव याना भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही तसेच त्यांच्या कडून ग्रूप च्या बहिणी याना आभार पत्र पण येते.या उपक्रमासाठी इ.१ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी तसेच महिला शिक्षिकांनी सुध्दा अतिशय सुंदर राख्या व आकर्षक भेटकार्ड बनविले होते.या भेटकार्डांवर अतिशय समर्पक असे घोषवाक्य लिहीलेली होती.सैनिकहो तुमच्यासाठी,,,,,,अशा भारवलेल्या भावनांनी सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकांसाठी राखी पाठविण्याच्या कार्यात दरवर्षी अग्रेसर असते.हा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. यामध्ये अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, जनता विद्यालय गांधीनगर मुख्याध्यापक  विवेक पवार, जनता विद्यालय पंचक मुख्याध्यापिका वैशाली उखिर्डे , शाळा क्रमांक ४९ चे केंद्रप्रमुख गोपाल बैरागी, मुख्याध्यापक दत्तात्रय सूर्यवंशी सोनल वाघ, सुनीता कटाळे मॅडम, ज्योती काळोखे,यांचे सहकार्य लाभले यावेळी सकल मराठा परिवाराचे समन्वयक , चैताली आहेर,स्नेहल काळे, सिंधुताई पगार,अपूर्वा पाटील, छाया फलाने, मोहिनी राव,प्रकाश बोराडे, कल्पेश बोराडे, संजय गोरडे, योगेश वरखडे, प्रवीण देशमुख,योगेश मुळाने,कल्पेश बोराडे, गणेश बढे, अभिषेक शिंदे,तसेच संपूर्ण सकल मराठा परीवार टीम उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन