पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड



लोकमत वृतपत्र समुहाने केला सन्मान; लंडन येथे पार पडला दिमाखदार सोहळा

मुंबई, दि. 19 : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ ही जागतिक परिषद पार पडली.
आपल्या कार्यातून देशाचे नाव जागतिक स्तरावर ज्यांनी उज्ज्वल केले आहे, अशा व्यक्तींना लोकमत वृतपत्र समूहाने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते. पंकजा मुंडे, यांनी आपल्या कुशल व अभ्यासू मार्गदर्शनखाली पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागात उल्लेखनीय काम करून एक नवा आयाम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.चर्चासत्रातही सहभाग महिलांनी मूल्यसंस्कार, देशाची समृद्ध संस्कृती आणि वारसा जपत उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले आहे, या विषयावर परिषदेत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, यातही श्रीमती मुंडे यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीमुळे राज्याच्या विकासात्मक प्रक्रियेत मला योगदान देता येत आहे. आजपर्यंत केलेल्या कार्याचा आणि माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे, असं मंत्री मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन