अभोणा चौफुली पोलीस स्टेशन अभोणा रस्त्याची चाळण तात्काळ दुरुस्ती न केल्यास रास्तारोकोचा इशारा
कळवण :- अभोणा चौफुली,पोलीस स्टेशन अभोणा रस्त्याची दैनीय अवस्था झाली आहे.याबाबत वेळोवेळी वाहनधारकांनी नागरिकांनी तक्रारी करुनही निद्रिस्त प्रशासनाला जाग येत नसल्याने वाहनधारक नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्याने नागरिकांना शाळकरी विद्यार्थी यांना पायी चालणे मुश्किल झाले आहे.आदीवासी बांधकाम कळवण विभागाचे अधिकारी पाटील, बिरारी यांना तक्रार केलेली आहे.मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.सदरच्या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी व्हावी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीक करित आहे.सदर रस्ता तात्काळ खड्डे मुक्त व्हावा अशी मागणी केली जात आहे.सदर रस्त्याबाबत विभागाचे इंजिनिअर पाटील, यांना श्री अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती कळवण तालुका कार्यकर्ता विजय चव्हाण यांनी निवेदन दिले आहे.
Comments
Post a Comment