ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक रोड सेवा केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

(प्रतिनिधी - समाधान शिरसाठ)
नाशिकरोड :- ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व प्रशासिका दादी प्रकाशमणीजी यांच्यापुण्यस्मरणानिमित्त विश्वबंधुत्व दिवसाचे औचित्य साधून नाशिक रोड सेवा केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे अध्यक्षस्थान नाशिक रोड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी भूषविले.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका अरुणा मुगुटराव, सामाजिक कार्यकर्त्या राजनंदिनी अहिरे,सिव्हिल हॉस्पिटलचे ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर डॉ.राजेंद्र दुसाने,मलबार हिलचे बिल्डर राजू सांगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या मनोगतात कारागृह अधीक्षिका अरुणा मुगुटराव,यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की,“संस्था फक्त रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांतच नव्हे तर कैद्यांच्या सुधारणेसाठी व पुनर्वसनासाठीही उल्लेखनीय कार्य करते. नियमित मूल्याधारित प्रवचनांमुळे कैद्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन होत असून ते एक चांगले नागरिक घडविण्याचे कामआहे.”अध्यक्षीय भाषणात शक्ती दीदी म्हणाल्या की, “दादी प्रकाशमणीजींचे संपूर्ण जीवन हे विश्वबंधुत्वासाठी वाहिले गेले. दादीजींच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून संकलित झालेले रक्त असंख्य रुग्णांच्या प्राणरक्षणास उपयुक्त ठरेल.”सामाजिक कार्यकर्त्या राजनंदिनी अहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आज अनेक लोक दान करण्यास टाळाटाळ करतात; परंतु ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.”राजू भाऊ सांगळे यांनी रक्तदानाच्या महत्त्वावर भाष्य करताना म्हटले की, “रक्त हे जीवनाचे अमृत आहे. ब्रह्माकुमारी सदस्य ध्यानातून सकारात्मक ऊर्जेने भारलेले आहेत, आणि त्यांच्या दानातून मिळालेले रक्त रुग्णांसाठी जीवनदानासोबतच सकारात्मकता घेऊन येईल.” डॉ. राजेंद्र दुसाने यांनी सांगितले की, “ब्रह्माकुमारी संस्थेच्या विविध सेवा केंद्रांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आम्ही प्रभावित झालो. सामान्यतः महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने त्यांचा सहभाग मर्यादित असतो; परंतु या शिबिरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला.”रक्तदान कार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी बीके महेंद्र भाई, बीके मनोज भाई बिके नितीन भाई,सारख्या युवकांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला. अनेक रक्तदात्यांनी दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. सर्व रक्तदात्यांना ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ईश्वरीय प्रसाद देण्यात आले.या शिबिरासाठी रक्त संकलनाचे कार्य सिव्हिल हॉस्पिटलच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई,यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन