साईनाथ नगर भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरीक त्रस्त


नाशिक इंदिरानगर :-  जॉगिंग ट्रॅक ते साईनाथ नगर वर्दळीच्या रस्त्यावर चिखल,ऑइल पडल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे.येथून मार्ग क्रमण करत असताना दर दिवशी दुचाकीस्वार घरंगळून पडून मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहे अनेक वाहनधारक रुग्णालयात उपचार घेत आहे. साईनाथ नगर सिग्नल कडून इंदिरानगर अंडरपास कडे जात असताना सिग्नलच्या पासून पुढे पन्नास फुटावरच रस्त्या वरुन जाये करणारे बांधकाम साहित्याचे मालवाहू ट्रकचा चिखल ऑइल हे रस्त्यावर पडल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे.येत्या दोन दिवसात हा रस्ता धुवून स्वच्छ खड्डे मुक्त करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील वाहनधारकांसह संजय गायकर,संतोष गोवर्धने, धीरज भोसले, प्रवीण वालझाडे,आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याठिकाणी पाणी साचत आहे.खड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे.वाहनधारकांनाजीव मुठीत धरून या ठिकाणाहून मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे पडल्याने अपघात होत आहे. रस्त्या उंच सखल झाल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे अनेक जणांचा अपघात झाल्याने भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. - डॉ. धनंजय अहिरे सामाजिक कार्यकर्ते, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, साईनाथ नगर ते डीजीपी नगर पर्यंत अवजड वाहने मोठ्या प्रमाणात चालतात येथे सांकेतिक फलक किंवा रस्त्यावर पट्टे मारावे जेणेकरून अपघात होणार नाही. खलील शेख सामाजिक कार्यकर्ते

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन