गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा नाशिक जिल्हापरिषदेत सन्मान
नाशिक जिल्हा जिल्हापरिषद कर्मचारी पतसंस्थेचा
नाशिकच्या जिप सभागृहात झाला दिमाखदार कार्यक्रम
नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे चेअरमन नितीन पवार,यांच्या अध्यक्षतेखाली दि,१०ऑगष्ट २०२५ रोजी जिप च्या केशवंराव थोरात सभागृहात झाली.तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा विध्यार्थिनींचा सन्मान यावेळी करण्यात आला.कृषी,पशु संवर्धन विभागाचे उपसचिव इंजिनिअर अंबादास चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दुर्गसंवर्धन अभ्यासक व्याख्याते प्रा राम खुर्दळ यांच्या हातून सेवा निवृतांचा व गुणवंतांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन हा सन्मान करण्यात आला.यावेळी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संस्थेचे राम खुर्दळ,यांनी विद्यार्थी व सेवानिवृत्त यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मनुष्याचे आयुष्य आहे तों पर्यंत त्याला सेवा करता येते, त्यामुळं सेवा कार्यासाठी कुठलं वय लागत नाही, सेवा निवृत्ती नंतर आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व्यायाम करा, सह्याद्रीत यायचे तर आमच्या सोबत दुर्ग संवर्धन कार्याला जोडा, नसेल जमत तर शिवकार्याला मोहिमेसाठी आर्थिक साहाय्य करा, विद्यार्थी दशेत मोबाईल पासून दूर राहून मोबाईल वर आपला धाक ठेवा त्याच्या आहारी जाऊ देऊ नका, गैरवापर केल्यास त्यामुळं तुमची बुद्धी कौशल्य वाचन शक्ती क्षीण होते, घरातील संवाद रुसतो,त्यामुळं मर्यादा, संयम, संस्कार जेष्टांची अज्ञा पालन करा, व यशस्वी व्हा, जशी आम्ही अखंडित गड संवर्धन कार्याने आमची ओळख निर्माण केली त्या प्रमाणे देशाची गावाची दुर्गाची सेवा करा,त्यानंतर मंत्रालयाचे कृषी उपसचिव अंबादास चंदन शिवे, यांनी करियर च्या संधी अगोदर शिक्षणातील विविध कक्षा समजून सांगितल्या,सेवानिवृत्त मंडळींनी आरोग्य जपा, पुढील आयुष्य आनंदात व स्वतः साठी जगा असे सांगितले. यावेळी ९२ गुणवंत तर ३९ सेवा निवृतांचा सन्मान करण्यात आला.संस्थेच्या कार्याचा आढावा प्रस्ताविका त मांडताना चेअरमन नितीन पवार,यांनी संस्थेने सभासद हितासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक कार्य,संस्थेची आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला, यावेळी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत यावेळी संस्थेच्या नूतन इमारती बाबतीत मंजुरी घेऊन ठरावं करण्यात आला, यावेळी चेअरमन नितीन पवार यांनी सभासदांना ९ टक्के लाभांश मंजूर केला, या कार्यक्रमात नाशिक जिल्हापरिषद पतसंस्थेचे पतसंस्थेचे चेअरमन नितीन पवार, व्हायचेअरमन रवींद्र थेटे,सचिव श्रीमती अर्चना गांगोडे,संचालक विक्रम पिंगळे, नंदकिशोर सोनवणे, अमर आडके,अनिल दराडे, चंद्रशेखर पाटील, किशोर अहिरे,रांजन थोरर्मिसे,रंजन पाटील,सचिन अत्रे, मंगेश जगताप,गणेश गायकवाड, श्रीमती सरिता पानसरे,संस्थेचे जेष्ठ सभासद रवींद्र थेटे,सचिन विंचूरकर, विजय हळदे,विजय देवरे, सागर गांगोडे,मधुकर आढावा, अजित आव्हाड,विलास शिंदे, श्रीरंग दीक्षित,किशोर वारे यासह राज्य परिषद कर्मचारी बैंकेचे संचालक ज्ञानेश्वर माळोदे,दरिमाता वृक्षमित्र परिवाराचे भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमात सूत्रसंचालन अभिजित देशमुख यांनी तर आभार संचालक अर्चना गांगोडे यांनी मांडले,
Comments
Post a Comment