शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळाचे ५९ वे गणेशोत्सव वर्षांचे सामाजिक कार्य

नाशिक :- हिंदु एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ,पाच रस्ता,नाशिक हे गेली ५९ वर्षे नाशिक शहरात सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेम जोपासणारे एक अग्रगण्य मंडळ म्हणून कार्यरत आहे. सन १९६६ मध्ये स्व. तुळशीराम बावरी आणि स्व. जगु वस्ताद गायकवाड यांनी या मंडळाची स्थापना केली.त्याकाळी उपेक्षित असलेल्या पाच रस्ता परिसरात प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या मंडळाने केली. उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने टेम्बलाई माता मंदिर आणि हनुमान मंदिर उभारले. मंडळाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे प्रत्येक वर्षी ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे सादर करणे.प्रबोधनात्मक देखाव्यांचा ठसा
आणीबाणी, महागाई, अंधश्रद्धा, दहशतवाद, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या,मतदार जनजागृती, पर्यावरण संवर्धन, पाणी बचत असे अनेक विषय मंडळाने देखाव्यांमधून मांडले आहेत. नाशिकमध्ये सर्वप्रथम हत्तीवरून गणेश मिरवणूक काढण्याचा उपक्रम याच मंडळाने राबवला. १९७८ मध्ये मर्दानी खेळाचे सादरीकरण करून प्रथम पारितोषिक पटकावले.

१९८० मध्ये हिंदू एकता आंदोलनाची स्थापना झाल्यानंतर मंडळाचे नाव बदलून शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ठेवण्यात आले आणि द्वारका चौकास ‘शहीद भगतसिंग चौक’ असे नाव देण्यात आले.
सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडी 
मंडळाने वेळोवेळी पुढील उपक्रम राबवले
▪️ सार्वजनिक दूरदर्शन संच स्थापन
▪️ पानपोई
▪️ वेवारस मृतांचे अंत्यसंस्कार
▪️ गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
▪️ मोफत अन्नदान व रक्तदान शिबिर
▪️ वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमा
▪️ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
▪️ अनाथाश्रम उपक्रम, रक्षाबंधन
▪️ पेटी वाचनालय स्थापन
▪️ पोलिस चौकीसाठी जागा दान
▪️ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत

गणेशोत्सव २०२५ – ' एक पेड मा के नाम' या विषयावर भव्य देखावा यावर्षी मंडळ ' एक पेड मा के नाम' या विषयावर प्रबोधनात्मक देखावा सादर करीत आहे. या देखाव्याची उत्सुकता शहरात शिगेला पोहोचली आहे. राज्य सरकार, निवडणूक आयोग आणि विविध सामाजिक संस्थांनी मंडळाच्या उपक्रमांना पुरस्कार व रोख पारितोषिकांनी गौरवले आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी अध्यक्ष प्रियंका सागर अहिरराव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर उपाध्यक्ष मंगला पवार, प्रकाश गायकवाड, उमेश पाटील सरचिटणीस अतुल रणशिंगे सचिव कल्पना गायकवाड सहचिटणीस स्वप्निल काथवटे खजिनदार प्रसाद बावरी सल्लागार मंडळ किरणसिंग पवार,महादु बेंडकुळे, सुरेश पवार, श्याम पवार, अनिल जाधव, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब मोरे, जयश्री सदभैया, करणसिंग बावरी, किशोर बागमार, बाळासाहेब कऱ्हाड, प्रतापसिंग पवार, किशोर बोचके, सुनील साळवे, हिरामण वाईकर स्वयंसेवक सदस्य राजेश धुमाळ, जीवा पवार,राजाभाऊ गाडगीळ,प्रतीक कसबे, शुभम गाडे,भारत सदभैय्या, रोशन जाधव, गुरुदेव पवार, नितीन काथवटे,आदित्य भालेराव,कुणाल चव्हाण, प्रेम पवार,ओम चव्हाण,मोहन खाडे,संजय पिंपळके,रुद्र सकट, नाना वाघ,भारत शेट्टी,परिसरातील नागरिक मंडळाच्या वतीने या वर्षी देखील सामाजिक भान असलेला देखावा साकारण्यात आला आहे.सार्वजनिक सहभाग आणि अनुशासनबद्ध उत्सव साजरा करण्यावर मंडळाकडून भर दिला जात आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन