टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

नाशिक ना.रोड :- रेल्वे स्टेशन नासिक रोड येथील टि.सी. यांचे सरकारी कामात अडथळ निर्माण करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीस रेल्वे पोलीस नाशिक रोड येथील पोलीसांना आले यश फिर्यादी नामे नंदकिशोर रमेश शिंदे वय 36 वर्श धंदा नौकरी ( रेल्वेत टि.सी. ) रा. ऋतुराज अपार्टमेन्ट रूम नं. 07 शनि मंदीर जेल रोड नाशिकरोड हे दि. 25.06.2025 रोजी सकाळी 05.25 वा.च्या सुमारास एक अनोळखी प्रवासी त्याचे वर्णन वय अं. 40 ते 45 वर्ष उंची 5 फुट 5 इंच रंगाने गहुवर्ण, अंगाने मजबुत, कपडे अंगात सफेद रंगाचा फुल बाहीचा शर्ट, नेसणीस काळया रंगाची फुल पॅन्ट अश्या वर्णनाच्या इसमाने फिर्यादी हे प्लॅटफाॅर्म नं. 1 वरील आ.एम.एस. ऑफिस जवळ डयुटी करत असतांना नमुद वर्णनाच्या इसमा हा पळु लागल्याने त्यास फिर्यादी यांनी तिकीट विचारले असता त्यास राग आल्याने फिर्यादी यांचे सोबत शाब्दिक वाद विवाद करून त्यांचे डयुटीत अडथळा निर्माण करून शर्टच्या वरिल खिश्यातुन काहीतरी वस्तु काढुन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारून दुखापत करून पळुन गेला त्याबाबत फिर्यादी यांना दुखापत झाल्याने व सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गु.र.नं. 114/2025 कलम 132, 121 (2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांनी पोलीस पथक तयार करून सदरचा तपास हा महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांना देऊन गुन्हयात आरोपीचा शोध घेणे बाबत सांगितले, सदर पोलीस पथकाने पाहीजे असलेल्या आरोपीचे वर्णन गुप्त बातमीदार यांना सांगुन तपासात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुशंगाने गुप्तबातमीदार यांनी 29/06/2028 रोजी कळविले की, नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळील मालधक्क्यावरील प्लॅटफाॅर्म आपण सांगीतलेल्या वर्णनाचा संशयीत इसम बसल्याचे सांगितले. पोलीस पथक व रेल्वे सुरक्षा बल येथील कर्मचारी यांनी मालधक्का येथे सापळा रचून एक संशयितास पकडले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रमेश साहेबराव गाडेकर राहणार पोस्ट सटोना ता. परतुर जि. जालना असे सांगीतले. तसेच गुन्हयाचे घटनेचे सिसिटीव्ही फुटेजचे हे मोबाईल द्वारे व्हिडीओ शुटींग केलेले हे त्यास दाखवता त्याने कबुल केले की, सदर व्हिडीओ मधील इसम हा मीच आहे. मी 04 दिवसांपुर्वी मनमाड येथुन रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे आलो व प्लॅटफाॅर्म वरून बाहेर जात असतांना टिसी याने मला आवाज दिला व माझे कडे तिकीट नसल्याने ते जवळ येत असतांना मी पळु लागल्याने टिसीने माझा पाठलाग करून मला पकडले व आमच्यात तिकीटावरून बाचाबाची झाली व तो ऑफिस ला चल असे म्हणत असल्याने मी माझे शर्टच्या खिष्यातील ब्लेड काढुन टिसीच्या तोंडावर मारले व त्याने माझे हात सोडल्याने व त्यास जखमी करून पळुन गेलो. असे सांगीतल्याने व सिसिटीव्ही फुटेजच्या वर्णनाच्या इसम रमेश साहेबराव गाडेकर हाच असल्याची खात्री झाल्याने सदर गुन्हयात आरोपीस महिला पोलीस उपनिरीक्षक टिळे यांनी आरोपीस अटक करून मा. कोर्टासमोर हजर केले. सदरची कार्यवाही ही स्वाती भोर, पोलीस अधिक्षक, रेल्वे छत्रपती संभाजीनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे, यांचे मार्गदर्षनाखाली रे.पो.स्टे. नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, पो उप निरीक्षक अश्विनी टिळे, सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील , पो.हवा. 520 शैलेंद्र पाटील, पो.हवा. 217 राज बच्छाव, रेल्वे सुरक्षाबल नाशिकरोड येथील निरीक्षक श्री. नविनकुमार सिंह, आरक्षक मनिशकुमार, सागर वर्मा, के.के. यादव यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला