जागतिक पर्यावरण दिन नाशिक महानगरपालिकेत साजरा




नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार, दिनांक ०५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून मनपाच्या मुख्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि जतन करण्याची शपथ घेतली.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (कर) अजित निकत, उपायुक्त (अतिक्रमण) अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे प्रशांत पगार, आस्थापना सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, तसेच शेखर चौरे, योगेश आडभाई, मनीषा पाटेकर, मनीषा येवला, संतोष कान्हे, मंगेश नवले, सचिन निमोणकर, शंकरराव पोरजे, साहेबराव भोसले, प्रशांत ठोके, रमेश पागे, दीपक बंदरे आदी मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण शपथेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,यांनी केले. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यावरण दिनाचे महत्त्व
जागतिक स्तरावर ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने १९७२ पासून या दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून पर्यावरणाची जपणूक, हवामान बदलाचा सामना आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी जनजागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. प्रत्येक नागरिकाने निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारून पृथ्वीच्या आरोग्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरीं यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन