मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना 'सहारा' कक्षाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : मविप्रच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'सहारा' कक्षाच्या लोकार्पणप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल आदींसह संचालक मंडळ व अधिकारी

नाशिक :-मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आराम आणि इतर सुविधा असलेल्या 'सहारा' या स्वतंत्र कक्षाचे लोकार्पण सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते व मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रारंभी मराठा विद्या प्रसारक समाजाचे समाजधुरीण आणि कर्मवीर यांना अभिवादन करून अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक ॲड. संदीप गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, विजय पगार, रमेश पिंगळे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक सदस्य प्रा. डॉ. संजय शिंदे, चंद्रजीत शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे यांनी स्वागत केले तर नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. सुनील ढिकले यांनी मनोगत व्यक्त करून प्रशस्त आणि हवेशीर अशा ‘सहारा’ कक्षाची माहिती दिली. नाशिक शहर, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मविप्र रुग्णालयात सर्वोत्तम, दर्जेदार आणि माफक अशी आरोग्य सेवा आणि उपचार देण्यासाठी मविप्र कार्यकारिणी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. 
यावेळी उपस्थित मविप्र सभासदांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मविप्र रुग्णालयात मिळत असलेल्या आरोग्य सेवा आणि सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर्स, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रवीण देवरे, अनिकेत पगार यांनी सूत्रसंचालन केले.
अशा आहेत सुविधा
या कक्षामध्ये रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकास राहण्याची आणि विश्रांतीसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाइल चार्जिंग, स्वच्छ पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह व प्रशस्त हॉल या व इतर सुविधा उपलब्ध आहेत.



Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला