अभोणा येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने भव्य नेत्र तपासणी उपचार शिबिर संपन्न
अभोणा :- आभोना शिवारात सामाजिक कार्यकर्त्यांकडून राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद श्री सत्य साईबाबांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन श्री सत्यसाई सेवा संघटना नाशिक पश्चिम महाराष्ट्र तसेच तुलसीआय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभोना तालुका कळवण येथे राबविण्यात आले यावेळी झालेल्या शिबिरात शेकडो रुग्णांनी सहभाग नोंदवला सदरचे शिबिर अन्नपूर्णा लॉन्स चणकापूर रोड अभोणा तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे मंगळवार दिनांक २४/०६/२०२५ रोजी सकाळी ९ ते ३ यावेळेत संपन्न झाले यावेळी उपस्थित शेकडो रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.आवश्यक असलेल्या रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन दोन तुकड्या करुन वाहनाने घेऊन जात नाशिकच्या तुलसी आय हॉस्पिटल येथे करण्यात आले.प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित नेत्र रुग्णांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.सदरचा समाज उपयोगी नेत्र तपासणी उपक्रम परिसरातील समाजसेवक गणेश मुसळे, रितेश पवार, अनिकेत मुसळे, कुशल भैय्या सोनजे, राहुल कामस्कर,शुभम वेढणे, यांनी राबविला.
Comments
Post a Comment