केटीएचएम महाविद्यालयाच्या पदव्यूत्तर वर्गांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरु
नाशिक :- मविप्र समाज संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या एमएस्सी भाग १ पदव्यूत्तर वर्गांचे प्रवेश ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेव्दारे होणार आहेत. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी www.kthmcollege.ac.in किंवा https://mvperp.org/admission या संकेतस्थळावर मेरिट फॉर्म भरावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले आहे.
संकेतस्थळद्वारे दि. १९ ते २६ जूनपर्यंत मेरिट फॉर्म भारता येणार आहेत. फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रिंट काढून मेरिट फॉर्म जपून ठेवावा. दि. २७ जून रोजी दु. ४ वा. संकेतस्थळावर प्रथम मेरिट लिस्ट प्रकाशित केली जाईल. दि. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता संबंधित विभागात समुपदेशन होईल. समुपदेशनाला उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशनवर हक्क सांगता येणार नाही. दि. २८ जून ते ०१ जुलै प्रवेशप्रक्रिया सुरु असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी दिली.
अशी आहे प्रवेशप्रक्रिया
प्रवेश फॉर्म भरल्यानंतर सदरील फॉर्म अप्रूव्ह केल्यानंतर विद्यार्थ्याने संकेतस्थळावर भेट देऊन पेमेंट गेटवे पर्याय निवडून ऑनलाइन फी भरावी. फी भरल्याची ऑनलाइन पावती जपून ठेवावी. महाविद्यालयात प्रवेश फॉर्म प्रत्यक्ष जमा करतेवेळी मूळ गुणपत्रिका, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, शैक्षणिक खंड पडला असल्यास गॅप सर्टीफीकेट ,आधारकार्ड, उत्पनाचा दाखला, बँक पासबुक, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थी सुरक्षा फॉर्म, विद्यार्थ्यांनी संबंधित विभागात जाऊन विभागप्रमुखाकडून आपला ॲडमिशन फॉर्म तपासून घेऊन त्यावर त्यांचे नांव व स्वाक्षरी तारखेसह घ्यावी. फॉर्म तपासून ओके केल्यानंतर तो ॲडमिशन काउंटरवर फीसह सादर करावा. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यावर पावती घेऊन जपून ठेवावी.
प्रवेशअर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरतांना त्यासोबत मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला दोन झेरॉक्स प्रत, शैक्षणिक खंड पडला असल्यास गॅप सर्टिफिकेट, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला, विद्यार्थ्यांचे बँक पासबुक, जातवैधता प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र स्कॅन करून आवश्यकतेनुसार अपलोड करावे.
प्रवेशअर्ज जमा करताना आवश्यक कागदपत्रे
ॲडमिशन फॉर्म जमा करताना जात प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातवैधता प्रमाणपत्र, बँक पासबुक, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थी सुरक्षा फॉर्म व मेडिक्लेम फॉर्म इ. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची पूर्तता संबंधित विद्यार्थ्यांनी करावी अन्यथा अपूर्ण कागदपत्रे असल्यास स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही, याची विद्यार्थ्यांने नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment