मविप्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
नाशिक :- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत औषधनिर्माण शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक येथील मविप्र फार्मसी कॉलेजमधील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेत घवघवीत यश प्राप्त केले.
सोमवारी (दि. २३) निकाल जाहीर झाला असून, यामध्ये डी.फार्मसी प्रथम वर्षातील अंशु यादव (82.40 %) प्रथम क्रमांक, ओमकार भागवत (80.60%) द्वितीय क्रमांक, तर स्नेहल जाधव (80.50%) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच डी.फार्मसी द्वितीय वर्षातील यशश्री उबाळे (84.27%) प्रथम क्रमांक, नारायणी गायकवाड (83.91%) द्वितीय क्रमांक आणि प्रिया गांगुर्डे (82.64%) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
महाविद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, पदाधिकारी व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, , प्राचार्य डॉ. डी. व्ही डेर्ले, विभागप्रमुख डॉ. के. आर. नाठे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment