मविप्रच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीद्वारे कॅडव्हर मस्क्यूलोस्केलेटल इंटरव्हेंशन कार्यशाळेचे उद्घाटन


नाशिक : मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित सोनोग्राफीद्वारे कॅडव्हर मस्क्यूलोस्केलेटल इंटरव्हेंशन कार्यशाळेचे उद्घाटन करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर.

अचूक निदान, उपचार अन् रुग्णसेवेला होणार लाभ : ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित सोनोग्राफीद्वारे कॅडव्हर मस्क्यूलोस्केलेटल इंटरव्हेंशन कार्यशाळेत बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर.

नाशिक :- सोनोग्राफीद्वारे कॅडव्हर मस्क्यूलोस्केलेटल इंटरव्हेंशन कार्यशाळा ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात संपन्न होत आहे. ही कार्यशाळा भरविण्याचा मान मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मिळाला. रेडिओलॉजी क्षेत्रात अचूक निदानात्मक तपासणीसाठी, डॉक्टरांना उपचारांत मदत करण्यासाठी आणि रुग्णसेवेसाठी या कार्यशाळेचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. 
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय व संशोधन केंद्रात रेडिओलॉजिस्ट यांची दोन दिवसीय सोनोग्राफीद्वारे मस्क्यूलोस्केलेटल इंटरव्हेंशन कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत संपूर्ण भारतातून ४२ क्ष-किरण तज्ञांनी सहभाग नोंदवला. 
ही कार्यशाळा डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील रेडिओलॉजी आणि इमेजिंग विभाग व शरीररचनाशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे, रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख डॉ. निलेश चौधरी, डॉ. प्रफुल्ल दखणे, डॉ. सुशांत भदाणे, डॉ. मंगेश थेटे, डॉ. ललेश नहाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
प्रात्यक्षिकासह डॉक्टरांना मार्गदर्शन
या कार्यशाळेत डॉ. श्रीनाध बोपन्ना, डॉ. अंकित शहा, डॉ. चिन्मय मेहता, डॉ. चैताली पारेख, डॉ. राजेश चौबल या तज्ञांनी प्रात्यक्षिकासह सोनोग्राफीद्वारे मानवी शरीरातील गुडघा, खांदा, मनगट, सांध्यांवर उपचार, त्यासंबंधीच्या निदानात्मक तपासण्या या विषयावर उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला