महिला डॉक्टर सह दोन महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल पेशंट कडून लाच मागने भोवलं
नाशिक :- राज्य सरकारच्या वतीने मोफत होणाऱ्या उपचारासाठी लाच मागणाऱ्या महिला डॉक्टर सह तिघांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल यामध्ये डॉ विशाखा सागर जागीरदार वैद्यकीय अधीक्षक नामको कॅन्सर रुग्णालय पेठ रोड पंचवटी नाशिक,जयश्री सचीन जगताप बिलींग क्लार्क नामको कॅन्सर रुग्णालय पेठ रोड पंचवटी नाशिक,गायत्री दत्तात्रय सोमवंशी बिलींग इन्चार्ज नामको कॅन्सर रुग्णालय पेठ रोड पंचवटी नाशिक,या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या पतीकडे तीस हजार रुपये लाच मागितली.याप्रकरणी हकीकत अशी आहे की नामको कॅन्सर रुग्णालय पेठ रोड पंचवटी नाशिक येथे पिवळे रेशनकार्ड धारक यांच्या पत्नीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली उपचार शस्त्रक्रिया करण्याच्या तसेच रुग्णांस सोडण्याच्या बदल्यात डॉ विशाखा सागर जागीरदार, वैद्यकीय अधीक्षक,जयश्री सचीन जगताप,बिलींग क्लार्क यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने,रुग्णांच्या नातेवाइकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालय गाठत तक्रार दाखल केली.सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या वतीने सापळा पुर्व पडताळणी केली असता कारवाई दरम्यान १) डॉ विशाखा सागर जागीरदार वैद्यकीय अधीक्षक, २)जयश्री सचीन जगताप, बिलींग क्लार्क यांनी ३० हजार लाचेची मागणी केली.व ३) गायत्री दत्तात्रय सोमवंशी,बिलींग इन्चार्ज यांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणी मध्ये निष्पन्न झाल्याने डॉ सह दोघा महिला कर्मचारीवर दिनांक ०९/०६/२०२५ रोजी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर येथे गुन्हा रजि.नं २९०/२०२५ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७,७ (अ)१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, तसेच अप्पर अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment