स्वामी विवेकानंद विद्यालयात गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे मोफत वह्यांचे वाटप
नाशिक पंचवटी :- पंचवटीतील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी शालेय गीतमंचाने सुमधुर संस्कृत गीत गायन केले.त्यानंतर गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा परिचय संस्थेच्या कार्याचा परिचय सेक्रेटरी हिरालाल परदेशी यांनी करून दिला.
मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर गुरुमितसिंग बग्गा उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना "आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले". कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मार्गदर्शक आयमा संस्थेचे खजिनदार गोविंद झा यांनी भूषविले त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व विद्यार्थ्यांना "मराठी अथवा हिंदी माध्यमातून शिकत असल्याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने कोणतेही काम करावे असे सुचविले.कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी उपमहापौर गुरमीतसिंग बग्गा, आयमा संस्थेचे खजिनदार गोविंद झा,स्वामी विवेकानंद सोसायटीच्या उपाध्यक्षा प्रेरणा कुलकर्णी, माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे,गणराज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमापती ओझा,संस्थेचे सदस्य तथा प्रसिद्ध उद्योगपती श्री लाल पांडे,रंगीता गुप्ता,लक्ष्मी गुप्ता,वर्षा सिंग, जया सिंग, जयप्रकाश दवे, मालती गायधनी, विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग, पर्यवेक्षिका शुभदा टकले, आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग,यांनी सर्व उपस्थितितांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चांगटे,यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता पिंगळे,दीपा काला, नीता पाटील, ज्योती जोशी, कलाशिक्षक पुंडलिक बागुल,ललित शार्दुल आदींनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment