न्यू मराठा हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू मराठा हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर मविप्र संस्थेचे संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, ज्ञानेश्वर कोतवाल, क्रीडाशिक्षक बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओमकार प्रतिमेचे पूजन करून जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. क्रीडाशिक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन करत उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, टी बॅलेन्स, त्रिकोणासन, पश्चिम उत्तासन, अनुलोम विलाम, जाणूशिर्षासन, शवासन व संगीतमय व्यायाम प्रकार करून घेतले. या जागतिक योग दिनानिमित्त मविप्र संचालक तथा शालेय समिती अध्यक्ष ॲड. लक्ष्मण लांडगे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत महत्त्व सांगून मुख्याध्यापक,विद्यार्थी, क्रीडाशिक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे ज्ञानेश्वर कोतवाल यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment