विश्वकर्मा क्रांती दलओबीसी ,विश्वकर्मा बलुतेदारांची राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाठपुरावा
मागण्यांतील ठळक मुद्दे तसेच संघटनेकडून राबविण्यात येणारे मुद्दे खालीलप्रमाणे
संघटना राज्यभर विश्वकर्मा सक्षमीकरण अभियान राबविणार आहे
महामंडळ, समिती सदस्यत्वासाठी राज्य सरकार महायुती घटक पक्षाकडे प्रतिनिधी यादीसह प्रस्ताव पाठवणार
योजनांचे प्रशिक्षण व अभियानासाठी पुढील बैठक पुणे येथे जून महिन्यात घेण्याचा मानस
जय विश्वकर्मा,जय क्रांती
सामाजिक न्याय व हक्कासाठी सदैव सक्रिय असलेल्या, महाराष्ट्रातील ओबीसी बलुतेदार विश्वकर्मा समूहाची राज्यस्तरीय संघटना विश्वकर्मा क्रांती दलाची मासिक सभा नुकतीच पार पडली.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण भालेराव (सिन्नर,नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील नांदेड,लातूर, हिंगोली,जालना, बीड, छ.संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा,वर्धा,अमरावती उत्तर महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर तसेच नाशिक, जळगाव, धुळे,नंदुरबार पश्चिम महाराष्ट्र सांगली कोकण,मुंबई विभागातील रत्नागिरी,रायगड व मुंबई जिल्ह्यातील सर्व विभाग व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
आद्य समाजनेते कर्मवीर स्व.नामदेवराव सुतार (संगमेश्वर) यांचा ओबीसी बलुतेदार चळवळीचा मंडल आयोगापासूनचा संघर्षाचा वारसा आणि समाजसेवेचा वसा वाहताना विश्वकर्मा क्रांती दलाने समाजापुढील आव्हाने व सामाजिक न्यायासाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केलेला आहे.
संघटनेने विश्वकर्मा समाज समूहाच्या संविधानिक न्याय मागण्यासाठी दि.१२ फेब्रु.२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत शिष्टमंडळासह भेट घेऊन बैठक घेतली होती.
समाजाच्या ४ दशकाच्या संघर्षानंतर मिळालेल्या उपलब्धींचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभर प्रचार प्रसार व जिल्हा,तालुका स्तरावर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. महायुतीतील शिवसेना (शिंदे),भाजप,राष्ट्रवादी(अजित दादा) यांच्याकडे प्रदेश पातळीवर प्रतिनिधींच्या यादीसह प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाने कार्यान्वित केलेल्या विविध महामंडळ, समितीवर विश्वकर्मा क्रांती दलाचे प्रतिनिधी नियुक्ती मिळावी तरुण सहकाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी बाळासाहेब पांचाळ प्रयत्नशील आहे.
विश्वकर्मा क्रांती दलाची समाजहिताय सामाजिक कार्यशैली तसेच स्पष्ट राजकीय भूमिका आणि महायुती साठी केलेलं प्राचार्य कार्य यासर्व बाबी समाजासमोर आहेत.
कोणताही श्रेयवाद किंवा वितुष्ट बाजूला सारून मा.आ.संजय रायमूलकर तसेच महामंडळासाठी अग्रणी भूमिका घेणारे विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत राज्यातील तालुका - जिल्हास्तरावर कार्यरत समाजसंस्था यांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येऊन कार्य करणार असल्याचे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येते की, कोणत्याही श्रेयवाद, खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नका. सर्व बाबी समाज्या समोर आहेत. महामंडळ ही उपलब्धी राज्यातील समाजासाठी आहे. व त्याचे लाभ समाजातील शेवटच्या गरजू घटकांना मिळवून देणे हेच आपले सामाजिक ध्येय असल्याचे समाजसेवक बाळासाहेब पांचाळ राज्य अध्यक्ष, विश्वकर्मा क्रांती दल राज्य समन्वयक, शिवसेना यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment