लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद (आप्पासाहेब)रामदास पेंढारकर,यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

धुळे :- येथील सहायक लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद (आप्पासाहेब)रामदास पेंढारकर,यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात सहकारी, मित्रमंडळी, नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न. पेंढारकर हे धुळे येथे शासकीय सेवेतील सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रमोद रामदास पेंढारकर, यांच्या सेवापुर्ती सोहळ्याप्रसंगी सहकारी अधिकारी,कर्मचारी, नातेवाईक,मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र. वा.निकम सहाय्यक संचालक लेखापरीक्षक अधिकारी धुळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोहन रघुनाथ कुवर उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकारी धुळे.नारायण भलकार आर पी कुवर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, अरुण दादा शिरोळे उत्तर महाराष्ट प्रमुख यशवंत सेना, डॉ. अनिल धनगर,राज्य उपाध्यक्ष मानव अधिकार नंदुरबार राहुल भलकार,उप अभियंता.सुदाम आण्णा भलकार, संचालक सुतगिरणी.नारायण भलकार,गोविंद देवरे, माजी सरपंच.प्रा सनेर सर. सोनाली ताई पगारे,मा सदस्य पंचायत समिती. प्रा बी जे बागुल, मिनाताई पेंढारकर, आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.एक सर्व सामान्य शेतकरी परिवारातला मुलगा अधिकारी होवुन सेवानिवृत्त होत आहे.त्यांच्या सेवेतील काही आनुभव तसेच नौकरी व्यतिरिक्त सुरू असलेल्या सामाजिक कार्याच्या आठवणीला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी उजाळा दिला पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा मान्यावरांनी दिल्या यावेळी पेंढारकर आप्पाची कन्या शरदा भलकार, मुलगा डॉ. मधुसुदन पेंढारकर, यांनी बालपणीच्या आठवणीला उजाळा देताना मन गहिवरून येईल अशा भावनिक आठवणींना उजाळा देत आई बाप काय असतात यावर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी आप्पासाहेबांनी उपस्थिताचे आभार व्यक्त करतानाच शासकीय सेवेतील काम करतांना आलेले चांगले वाईट अनुभव कथन केले.नोकरीत असतांना वेगळ्या ठिकाणी बदल्या होत होत्या काही वेळा मुक्कामीही घरदार सोडून राहवे लागत असे माझ्या पत्नीने गंभीरपणे साथ देत मुलांचे शिक्षण संगोपन करुन मुलांना स्वताच्या पायावर उभ केले.शासकीय सेवेत इमानेइतबारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.यापुढे सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी सहभागी होणार आहे.यावेळी उपस्थित सहकारी,मित्रपरिवार,नातेवाईकांसह उपस्थित सर्वांचे आभार पेंढारकर यांनी व्यक्त केले.माणुस स्वता,व कुटुंबातील सदस्यांसाठी जगतो.त्याचबरोबर परोपकाराची भावना ठेवत जिवन व्यतीत केले तर जीवनाचे सार्थक होते.असे प्रतिपादन त्यांनी सेवापुर्ती सोहळ्याप्रसंगी केले.सहकारी मित्रपरिवार नातेवाईक यांचे आभार त्यांनी व्यक्त केली.सेवापुर्ती भव्य कार्यक्रम सोहळा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर रामदास पेंढारकर, डॉ.भुषण प्रमोद पेंढारकर,डॉ मधुसुदन पेंढारकर,डॉ सौ पियुषा पेंढारकर,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक गोरख धनगर,यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला